पुणे : ऑनलाईन परीक्षांमधील वाढते कॉपीचे प्रमाण रोखण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने ‘प्रोटोकॉल’नुसारच परीक्षा देण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले आहे. कॉपी करताना पकडल्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांवर आता कडक कारवाई होणार असून त्यांतर्गत फौजदारीही होऊ शकते, असेही विद्यापीठाने स्पष्ट केले आहे. (Pune University Exam Updates)
विद्यापीठाशी सलग्न महाविद्यालयांच्या फेब्रुवारी आणि मार्च मधील सत्र परीक्षा ऑनलाईन पद्धतीने १५ फेब्रुवारीपासून सुरू झाल्या असून, ‘प्रॉक्टर्ड’ पद्धतीने गैरप्रकारांवर लक्ष ठेवण्यात येते. ऑनलाईन परीक्षांमध्ये गेल्या वर्षी गैरप्रकार करणाऱ्या एक हजाराहून अधिक विद्यार्थ्यांना पकडण्यात आले. त्यातील जवळजवळ सर्वच विद्यार्थ्यांनी कॉपी केल्याचे उघड स्पष्ट झाल्यामुळे त्यांच्यावर कारवाई झाली. विशेष म्हणजे कॉपीबहाद्दरांमध्ये सर्वाधिक प्रमाण हे अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचे होते.
अशी पकडली जाते ऑनलाईन कॉपी
एप्रिल-मे महिन्यात २०२०-२१ या शैक्षणिक वर्षाच्या प्रथम सत्राची परीक्षा घेताना त्यात प्रोक्टॅर्ड पद्धतीचा वापर विद्यापीठाने सुरू केला. विद्यार्थ्यांना मोबाईल, लॅपटॉप, टॅबचा फ्रंट कॅमेरा सुरू ठेऊन परीक्षा द्यावी लागली. त्यामध्ये मोबाईलमध्ये दुसरी विंडो सुरू केली, इंटरनेट बंद केले किंवा संशयास्पद हालचाली केल्यास त्यास इशारा दिला जात आहे.
कॉपीचा फंडा
गैरप्रकार करण्यासाठी कॉपीबहाद्दरांनी समाजमाध्यमांचा फायदा घेतला आहे. त्यावर विविध प्रकारचे गट करून प्रश्नपत्रिकेचा स्क्रीनशॉट जातो. त्यानंतर ग्रुपवरील सदस्य त्याची उत्तरे देता. मात्र हे करत असताना विद्यार्थ्याच्या हालचाली, मोबाईल किंवा लॅपटॉपवरील विंडोबदल टिपला जातो आणि विद्यार्थी पकडले जातात. काही वेळा कॅमेरॅची वायर कट करणे, कॅमेरा फिरविणे, आदी प्रकार कॉपीबहाद्दर अवलंबित असल्याचे समोर आले आहे.
बाजू मांडण्याची विद्यार्थ्यांना संधी
संपूर्ण शहानिशा करूनच अशा विद्यार्थ्यांचे गैरप्रकार पकडण्यात येतात. या विद्यार्थ्यांना अनफेअर मिन्स कमिटीसमोर बोलविण्यात येणार आहे. तेथे विद्यार्थ्यांसमोर परीक्षा विभागाकडे असलेले पुरावे ठेवण्यात येतील. त्यावर विद्यार्थ्यांना आपली बाजू मांडता येते, अशी माहिती डॉ. काकडे यांनी दिली.
कायद्यातील प्रावधान
महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ कलम १७(५) छ नुसार गैरप्रकार घडल्यास परीक्षा पुढे ढकलण्याचे, अंशतः किंवा पुर्णतः रद्द करण्यात येते. तसेच परीक्षेतील गैरप्रकारासबंधी विद्यार्थ्यांवर किंवा गटावर शिस्तभंगांची, दिवाणी किंवा फौजदारी कारवाई होऊ शकते. माहिती तंत्रज्ञान कायदा (सुधारीत) २०१६ नुसार गोपनीय माहितीचा सार्वजनीक ठिकाणी प्रसार करणे दखलपात्र गुन्हा दाखल होतो. प्रश्नपत्रिका ही गोपनीय दस्ताऐवज आहे.
परिक्षेतील गैरप्रकार (वर्ष २०२१)
सत्र ः प्रथम ः द्वितीय
परीक्षेचा कालावधी ः एप्रिल - मे ः जुलै-ऑगस्ट
परीक्षार्थी ः ५.७९ लाख ः ६ लाख
गैरप्रकार करणारे परीक्षार्थी ः ३५० ः ७६१
अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचे प्रमाण ः २८० ः ७२५
फौजदारी गुन्ह्याची तरतूद पुर्वीपासूनच आहे. प्रश्नपत्रिका हा गोपनीय दस्ताऐवज असून, समाजमाध्यमांवर त्याचा प्रसार होणे हा दखलपात्र फौजदारी गुन्हा आहे. हे लक्षात घेऊन भवितव्याचा विचार करून विद्यार्थ्यांनी परीक्षेत गैरप्रकार करू नये, असे आवाहन विद्यापीठ सुरवातीपासूनच करत आहे.
- डॉ. महेश काकडे, संचालक, परीक्षा व मुल्यमापन मंडळ
गैरप्रकार करणाऱ्यांमध्ये तंत्रज्ञान अवगत असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक असल्याचे आधीच्या परीक्षांतुन स्पष्ट झाले आहे. यंदाच्याही परीक्षेत कोणताही गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही. कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कडक कारवाई होणार आहे.
- डॉ. मनोहर चासकर, अधिष्ठाता, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.