कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे अखेर पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील निर्बंध शिथिल करण्याची घोषणा पालकमंत्री अजित पवार यांनी रविवारी केली. त्यानंतर महापालिकेने त्याबाबतचे आदेश काढले आहेत. पण हे नेमके निर्बंध कसे असतील, काय सुरू राहणार, काय बंद राहणार याबाबत नागरिकांच्या मनातील प्रश्नांची ही उत्तरे.
प्रश्न - शहरातील दुकाने कधी सुरू राहणार व वेळ काय ?
उत्तरः अत्यावश्यक सेवेसह सर्व दुकाने आठवड्यातील सर्व दिवस सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत खुली राहणार.
प्रश्न - मॉल सुरू होणार का ?
उत्तर - होय. आठवड्यातील सर्व दिवस रात्री आठपर्यंत सुरू राहणार.
प्रश्न - मॉल सुरू होताना, त्यावर बंधने आहेत का?
उत्तर - होय. दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांनाच खरेदीसाठी जाता येईल. मॉलमधील कर्मचाऱ्यांचे दोन्ही डोस झाले पाहिजेत व दर १५ दिवसांनी त्यांची कोरोना चाचणी करावी.
प्रश्न - हॉटेल, रेस्टॉंरन्ट, फूड कोर्टसाठी सवलत दिली आहे का ?
उत्तर - होय. हॉटेल ५० टक्के क्षमतेने आठवड्याचे सर्व दिवस रात्री १० पर्यंत खुले असतील.
प्रश्न - पार्सल सेवा सुरू आहे का ?
उत्तर - होय. पूर्वीप्रमाणे रात्री ११ पर्यंत पार्सल सेवा सुरू आहे.
प्रश्न - उद्याने सुरू होणार का? वेळ काय असेल?
उत्तर - शहरातील उद्याने सुरू होणार आहेत. सकाळी ६ ते १० व दुपारी ४ ते सायंकाळी ७ या वेळेत खुले असतील.
प्रश्न - मैदानावरील खेळ सुरू राहणार का ?
उत्तर - होय. पूर्वीप्रमाणे सर्व इनडोअर व आउट डोअर खेळ सुरू राहतील
प्रश्न - कोणत्या खेळावर बंधने आहेत?
उत्तर - जलतरण व निकट संपर्क येणारे खेळ बंद असतील.
प्रश्न - शाळा, महाविद्यालये सुरू होणार का ?
उत्तर - नाही. शहरातील शाळा महाविद्यालये आताच सुरू होणार नाहीत. केवळ आॅनलाइन शिक्षण सुरू असेल
प्रश्न- खासगी शिकवणी, स्पर्धा परीक्षा क्लासेस सुरू होणार का ?
उत्तर - खासगी क्लासेस, स्पर्धा परीक्षा केंद्र रात्री ८ पर्यंत ५० टक्के क्षमतेने सुर राहणार. शिक्षक व विद्यार्थ्यांचा लसीचा किमान एक डोस आवश्यक
प्रश्न - जीम, सलून सुरू राहणार का ?
उत्तर - होय. जीम, सलून, ब्युटी पार्लर, वेलनेस सेंटर स्पा अप्वाइनमेंट घेऊन क्षमतेच्या आसन क्षमतेच्या ५० टक्के रात्री ८ पर्यंत सुरू राहतील.
प्रश्न - हे आदेश कोणाला लागू असतील.
उत्तर - पुणे महापालिका क्षेत्रासह पुणे कॅन्टोन्मेंट, खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाला नियम लागू आहेत.
प्रश्न- शहरात संचारबंदी असणार का ?
उत्तर - होय. पहाटे पाच ते रात्री ११ पर्यंत जमावबंदी असेल तर रात्री ११ ते
पहाटे ५ पर्यंत संचारबंदी असेल. केवळ अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडता येईल
प्रश्न - चित्रपट गृह, मल्टीप्लेक्स खुले होणार का ?
उत्तर - नाही. शहरातील चित्रपटगृह, मल्टीप्लेक्स अद्याप बंदच असणार
प्रश्न - धार्मिक स्थळे उघडणार का ?
उत्तर - नाही.
प्रश्न - पीएमटी सेवा सुरू राहणार का ?
उत्तर - होय. ५० टक्के आसन क्षमतेने सेवा सुरू राहणार
प्रश्न - कार्यक्रमांसाठी संख्येचे बंधन आहे का ?
उत्तर - होय. सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम आसन क्षमतेच्या ५० टक्के उपस्थितीत घेता येतील.
प्रश्न - लग्न समारंभास मान्यता आहे का ?
उत्तर - होय. ५० जणांच्या उपस्थितीत लग्न समारंभ करता येतील.
प्रश्न - अंत्यविधीसाठी संख्येचे बंधन आहे का ?
उत्तर - होय. २० जणांच्या उपस्थितीत अंत्यविधी करता येतील.
जिल्ह्यातील नव्या रुग्णांचा पॉझिटिव्हीटी रेट साडेपाच टक्के असल्यामुळे जिल्ह्यातील निर्बंध फारसे शिथिल झालेले नाहीत. तेथील दुकाने, हॉटेल्स सायंकाळी चार वाजेपर्यंतची उघडी राहणार असल्याचेही पवार यांनी स्पष्ट केले. मंदिरे, शाळा-महाविद्यालये बंदच राहणार असल्याचा पुनरूच्चारही त्यांनी केला.
गणेशोत्सवाचा निर्णय मुख्यमंत्र्याकडे
सार्वजनिक गणेशोत्सवाबाबत मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर बैठक होते. राज्यातील प्रमुख गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसोबत मुख्यमंत्री चर्चा करून निर्णय घेतील. गर्दीच्या ठिकाणी कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे काही कालावधीसाठी उत्साहाला मुरड घातली पाहिजे. बंधने पाळली पाहिजेत. त्याला पर्याय नाही,’ असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.
सोमवारपासून हे सुरू राहणार
- सर्व दुकाने साप्ताहिक सुटी वगळता सकाळी सात ते रात्री आठ वाजेपर्यंत (दुकानमालक, कामगारांना मास्क आणि दोन्ही डोस घेणे बंधनकारक)
- हॉटेल, रेस्टॉरंट, बिअर बार रात्री दहा वाजेपर्यंत (५० टक्के क्षमतेसह आणि शारीरिक अंतर आवश्यक)
- मॉल्स रात्री दहा वाजेपर्यंत (कर्मचाऱ्यांसह दोन डोस घेतलेल्या ग्राहकांनाच प्रवेश)
- इनडोअर, आउटडोअर खेळांना परवानगी
- उद्याने (सकाळी ६ ते १० आणि सायंकाळी ४ ते ७)
पुणे ग्रामीण भागात
- दुकाने, हॉटेल, रेस्टॉरंट (सकाळी सात ते दुपारी चार वाजेपर्यंत)
- स्पर्धा परीक्षा क्लासेस, कोचिंग क्लासेस रात्री ८ पर्यंत खुले राहतील (५० टक्के आसन क्षमतेसह)
- व्यायामशाळा, सलून, ब्युटी पार्लर, स्पा रात्री ८ पर्यंत ((५० टक्के क्षमतेनुसार)
हे बंद राहणार
- सर्व धार्मिक स्थळे
- शाळा-महाविद्यालये (पुढील निर्णय होईपर्यंत)
- जलतरण तलाव
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.