पुणे : बूस्टर डोस अडकला अटींच्या गर्तेत

हा डोस घेण्यासाठी दुसऱ्या डोसनंतर किमान नऊ महिने कालावधी पूर्ण होणे आवश्‍यक असणे अनिवार्य आहे.
booster dose
booster doseesakal
Updated on

पुणे : पुणे शहर व जिल्ह्यातील कोरोना संसर्गाच्या प्रतिबंधासाठी सुरू करण्यात आलेला कोरोनाचा तिसरा डोस (Booster Dose) अटींच्या गर्तेत अडकल्याचे चित्र निर्माण झाले आहे. हा डोस घेण्यासाठी दुसऱ्या डोसनंतर किमान नऊ महिने कालावधी पूर्ण होणे आवश्‍यक असणे अनिवार्य आहे. या नियमांमुळे बूस्टर डोससाठी पात्र पुणेकर मिळेनासे झाले आहेत. परिणामी पुण्यात हे लसीकरण कासवगतीने पूर्ण होऊ लागले आहे. याचे प्रमाण वाढविण्यासाठी पात्रतेच्या नियमांमध्ये शिथिलता आणणे गरजेचे आहे. (Pune District Booster Dose Updates)

बूस्टर डोसला नियमांचा अडसर निर्माण झाल्याने मागील तीन आठवड्यात पुणे जिल्ह्यातील केवळ २३ टक्के ज्येष्ठ नागरिकांना, १२ टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांना आणि सात टक्के फ्रंटलाईन वर्कर्सलाच याचा लाभ घेता आला आहे. आकडेवारीनुसार पाहावयाचे झाल्यास आतापर्यंत फक्त ६० हजार ४१३ ज्येष्ठ नागरिक, २३ हजार ४५४ आरोग्य कर्मचारी आणि २७ हजार ७३१ फ्रंटलाइन वर्कर्सनाच बूस्टर डोस घेता आला आहे.

booster dose
UP Eletctions : काँग्रेस नेता कन्हैय्या कुमारवर अ‍ॅसिड हल्ला?

शहर व जिल्ह्यात १० जानेवारी २०२२ पासून कोरोनाचा बूस्टर डोस देण्यास सुरवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात हा डोस केवळ ६० वर्षांपेक्षा अधिक वय असलेले ज्येष्ठ नागरिक, आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन वर्कर्सनाच हा डोस देण्यात येत आहे. या बूस्टर डोससाठी पात्र होण्यासाठी संबंधित संवर्गातील व्यक्ती असणे, संबंधित व्यक्तीचे दोन्ही डोस पूर्ण होणे आणि दुसरा डोस घेतल्यानंतर किमान नऊ महिन्यांचा कालावधी पूर्ण होणे बंधनकारक आहे.

पुण्यात अवघ्या २० हजार ज्येष्ठांना फायदा

पुणे शहरातील ६० वर्षांपुढील ९५ हजार ७३० ज्येष्ठ नागरिकांचे दोन्ही डोस पूर्ण झालेले आहेत. यापैकी आतापर्यंत अवघ्या २० हजार ५६६ ज्येष्ठ नागरिकांनाच बूस्टर डोसचा लाभ घेता आला आहे. या डोसचे ज्येष्ठ नागरिकांचे हे प्रमाण एकूण उद्दिष्टाच्या केवळ २१ टक्के असल्याचे आरोग्य विभागाच्यावतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या लसीकरण अहवालातून उघडकीस आले आहे.

क्षेत्रनिहाय पात्र, लाभ घेतलेले ज्येष्ठ नागरिक

पुणे शहर --- ९५ हजार ७३० --- २० हजार ५६६ (२१ टक्के)

पिंपरी चिंचवड --- ५६ हजार ३५५ --- २७ हजार ३९ (४८ टक्के)

पुणे ग्रामीण --- १ लाख १३ हजार ३८८ --- १२ हजार ८०८ (११ टक्के)

जिल्हा एकूण --- २ लाख ६५ हजार ४७३ --- ६० हजार ४१३ (२३ टक्के)

बूस्टर डोस घेतलेले आरोग्य कर्मचारी

पुणे शहर --- ८७ हजार ४२२ --- १२ हजार १८९ (१४ टक्के)

पिंपरी चिंचवड --- ४४ हजार १२४ --- ४ हजार २५० (१० टक्के)

पुणे ग्रामीण --- ६६ हजार ८५३ --- ७ हजार १५ (१० टक्के)

जिल्हा एकूण --- १ लाख ९८ हजार ३९९ --- २३ हजार ४५४ (१२ टक्के)

तिसरा डोस घेतलेले फ्रंटलाइन वर्कर्स

पुणे शहर --- १ लाख ९ हजार ८११ --- ८ हजार २४१ (८ टक्के)

पिंपरी चिंचवड --- ५४ हजार ६९० --- ३ हजार ९७ (६ टक्के)

पुणे ग्रामीण --- १ लाख २७ हजार ४२३ --- ९ हजार ३९३ (७ टक्के)

जिल्हा एकूण --- २ लाख ९१ हजार ९२४ --- २० हजार ७३१ (७ टक्के)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.