लस निर्मितीतील भीष्माचार्य डॉ. सुरेश जाधव यांचे निधन

सिरम इन्स्टिट्यूटचे कार्यकारी संचालक डॉ. सुरेश जाधव (वय ७१) यांचे बुधवारी निधन झाले.
सिरम इन्स्टिट्यूटचे कार्यकारी संचालक डॉ. सुरेश जाधव
सिरम इन्स्टिट्यूटचे कार्यकारी संचालक डॉ. सुरेश जाधव
Updated on

पुणे : सिरम इन्स्टिट्यूटचे कार्यकारी संचालक डॉ. सुरेश जाधव (वय ७१) यांचे बुधवारी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर दुपारी एक वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

डॉ. जाधव हे बुलढाण्यासारख्या छोट्या गावातून पुण्यात आले. त्यांनी भारतातील लस संशोधनात जागतिकस्तरावर कामातून स्वत:चा वेगळा ठसा उमटविला. त्यामुळे त्यांन भारतीय लस संशोधनातील भिष्माचार्य म्हटले जात. त्यांच्या नावे जगातील अनेक पेटंटची नोंद आहे. कोरोना प्रतिबंधक कोव्हीशिल्ड लशीच्या निर्मितीमध्ये त्यांचे मोलाचे योगदान आहे. डॉ. जाधव यांच्या जाण्यामूळे भारतीय वैद्यकिय क्षेत्राची अपरिमित हानी झाली असल्याची भावना औषध निर्माण क्षेत्रातून व्यक्त करण्यात आली.

सिरम इन्स्टिट्यूटचे कार्यकारी संचालक डॉ. सुरेश जाधव
राज्याला मोठा दिलासा; दिवसभरात आढळला नाही ओमिक्रॉनचा रुग्ण

डॉ. जाधव यांनी नागपूर विद्यापीठातून फार्मसीमध्ये 'पीएच. डी.' घेऊन १९७० पासून पन्नास वर्षांची अखंड सेवा दिली. त्यांचा कार्यकाल मार्च २०२२ पर्यंत असला तरी आरोग्यविषयक कारणामुळे त्यांनी ऑक्टोबरमध्ये स्वेच्छा निवृत्ती घेतली होती.

ते सुरुवातीला नागपूर विद्यापीठ व 'एसएनडीटी' विद्यापीठ येथे शिक्षक म्हणून काम केल्यानंतर हापकिनमध्ये संशोधक म्हणून त्यांनी लस उत्पादनासंबंधी आपले काम चालू केले. सन १९७९ पासून सिरम इन्स्टिट्यूट येथे रुजू झाले. ते सिरम इन्स्टिट्यूटचे १९९२ पासून कार्यकारी संचालक म्हणून काम पाहू लागले. जागतिक आरोग्य परिषद असो कि राष्ट्रीय लसीकरण धोरण, इंडियन फार्माकोपिया किंवा लस उत्पादन इत्यादी संबंधी कोणतीही समिती असो तेथे जाधव सरांचे योगदान ठरलेले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.