पुण्याची चिमुकली वल्लरी तुळणकर मध्यवर्ती भूमिकेत

राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये गौरविलेल्या ‘फास’ या समस्याप्रधान मराठी चित्रपटाद्वारे पुण्यातील अवघ्या दहा-बारा वर्षांची चिमुरडी आपल्यासमोर आली आहे.
Vallari Tulankar
Vallari TulankarSakal
Updated on

पुणे : राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये गौरविलेल्या ‘फास’ या समस्याप्रधान मराठी चित्रपटाद्वारे पुण्यातील अवघ्या दहा-बारा वर्षांची चिमुरडी आपल्यासमोर आली आहे. या मुलीचे नाव आहे वल्लरी मकरंद तुळणकर!

Vallari Tulankar
कृषिमंत्र्यांचे राज्यसभेत महत्त्वाचे विधान; विधानसभेच्या निवडणुकांनंतर...

बळीराजा हा ‘राजा’ नसून यंत्रणेचा ‘बळी’ ठरला, असे या चित्रपटाचे मध्यवर्ती कथानक असून या चित्रपटाची निर्मिती माहेश्वरी चाकूरकर-पाटील यांनी केली आहे. तसेच लेखनही त्यांचे आहे.

पहिल्या चित्रपटाविषयी आलेले अनुभव सांगताना वल्लरी म्हणाली, चित्रपटाच्या सेटवर पहिल्या दिवशी गेल्यानंतर मला प्रचंड भीती वाटली, कारण तेथे माझ्या ओळखीचे कुणीच नव्हते. चित्रपटात आई, वडिल आणि भावाची भूमिका करणारे कलाकार यांच्याशी माझा थोडा परिचय होता. चित्रिकरणादरम्यान हळूहळू सगळ्यांच्या ओळखी होऊ लागल्या; मैत्रीचा धागा जुळला. चित्रिकरणस्थळ प्रशस्त असल्याने माझे चित्रिकरण नसताना मी एका कडेला बसून असायचे. ज्या वेळेला माझे चित्रिकरण सुरू होणार होते त्या वेळेला माझे नाव पुकारले गेले. त्यावेळी मला प्रचंड भीती वाटली. पण कालांतराने सेटवरील सगळे कलाकार-तंत्रज्ञ यांच्याशी गट्टी जमली आणि मला चित्रिकरणात मजा येऊ लागली.

Vallari Tulankar
नितेश राणेंचा आज फैसला! प्रकृतीच्या कारणास्तव सध्या रुग्णालयात

चित्रीकरण अन शोध मोहिम

एक सीन चित्रित करून झाला की मी इकडे-तिकडे फिरायचे, खेळायचे. तो परिसर परिचित नसल्याने तेथे काय काय आहे याचा मी शोध घेत असे. चित्रिकरणासाठी बोलाविले की सेटवर जाऊन चित्रिकरण झाल्यानंतर पुन्हा शोधमोहीम सुरू करीत असे, असे ही तिने सांगितले.

कलाकारांबरोबर दंगामस्ती

सेटवरील कलाकारांबद्दल ती म्हणाली, सर्वात पहिल्यांदा माझी गट्टी जमली ती चित्रपटात माझ्या भावाची भूमिका करणार्‍या कलाकाराशी. त्याच्या माध्यमातून इतर मुलांशी माझी मैत्री झाली. आम्ही सगळे मिळून खेळायचो, दंगा करायचो. कधी कधी तर मारामारीही करायचो. चित्रिकरण संपल्यानंतर रूमवर आलो की वेगवेळे चित्रपट पहायचो. दुसर्‍या दिवशी पहाटे उठून मस्तपैकी आवरून चित्रिकरणासाठी जायचो. जवळजवळ एक महिना चित्रिकरण सुरू होते.

Vallari Tulankar
खडकवासला येथील पाणीपुरवठा विस्कळीत; नागरिकांची गैरसोय

सीनची तयारी भारी

शूटिंगच्या तयारी बद्दल तिने सांगितले की, चित्रपटातील माझ्या आईने माझ्याकडून काही सीन करून घेतले. त्यानंतर मला काही संवाद पाठ करायला दिले. संवाद पाठ झाल्यानंतर चित्रिकरणास बोलाविण्यात येत असे.

मित्र-मैत्रिणींना उत्सुकता

वल्लरीला नृत्य आणि गाण्याची आवड आहे. शाळेतील स्नेहसंमेलनात नृत्य, गाणे सादर केले असून नाटकातही तिने भूमिका केली आहे. या चित्रपटाची थीम खूप छान आहे; मला चित्रपटात काम करायला खूप आवडले. चित्रपटाविषयी माझ्या मित्र-मैत्रिणींनाही खूप उत्सुकता असून तेही चित्रपट पहायला येणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()