Pune Vidhan Sabha: महाविकास आघाडीचं ठरलं! पुण्यात विधानसभेसाठी 'अशी' होणार 8 जागांची वाटणी

Maha Vikas Aghadi: 2019 च्या विधानसभा निवडणुका भाजप आणि शिवसेनेने एकत्र लढवल्या होता. मात्र, त्यावेळी शिवसेनेला पुण्यातून एकही जागा लढवता आली नव्हती. येथील सर्व 8 जागा भाजपनेच लढवल्या होत्या.
Sharad Pawar, Nana Patole And Uddhav Thackeray.
Sharad Pawar, Nana Patole And Uddhav Thackeray.Esakal

लोकसभा निवडणुकीत महायुतीचा धुव्वा उडवल्यानंतर महाविकास आघाडीचा आत्मविश्वास चांगलाच दुणावला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीने पुढील दोन तीन महिन्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे. असे असले तरी आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षांमध्ये जास्तीत जास्त जागा पदरात पाडूण घेण्यासाठी चढाओढ सुरू आहे.

या सर्व घडामोडींमध्ये पुण्यातील 8 जागांपैकी कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार याविषयीची मोठी माहिती समोर आली आहे.

पुणे शहरात विधानसभेचे एकूण 8 मतदारसंघ आहेत. यामध्ये शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि ठाकरेंच्या शिवसेनेने प्रत्येकी तीन जागांवर दावा केला आहे. या परिस्थितीत काँग्रेसने मात्र संयम बाळगणे पसंत केले आहे.

महाविकास आघाडीच्या प्राथमिक चर्चेनुसार शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला आणि काँग्रेसला प्रत्येकी 3 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला दोन जागा मिळणार असल्याचे बोलले जात आहे.

असे असले तरी स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांनी कामाला लागावे अशा सूचना तिन्ही पक्षांच्या वरिष्ठांनी दिल्याचे सांगण्यात येत आहे.

Sharad Pawar, Nana Patole And Uddhav Thackeray.
Suresh Birajdar: सुरेश बिराजदारांना मिळणार विधानपरिषदेवर संधी? अजित पवारांच्या भूमिकेकडे लक्ष

कोणत्या पक्षाला कोणती जागा?

काँग्रेस

मिळालेल्या माहितीनुसार पुण्यात काँग्रेस पक्षाला शिवाजी नगर, कॅन्टोन्मेंट आणि कसबा पेठे हे मतदारसंघ मिळण्याची शक्यता आहे. कारण यात कसब्यात काँग्रेसचे रवींद्र धंगेकर हे विद्यामान आमदार आहेत. तर शिवाजीनगरमध्ये काँग्रेस उमेदवाराचा 2019 च्या निवडणुकीत थोडक्यात पराभव झाला होता. तिकडे कॅन्टोन्मेंट बोर्ड मतदारसंघ हा माजी मंत्री बागवे यांचा मतदारसंघ आहे. त्यामुळे तो मतदारसंघ काँग्रेसतर्फे बागवे यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे.

Sharad Pawar, Nana Patole And Uddhav Thackeray.
Shrikant Shinde: येत्या विधानसभेत महायुतीचेच सरकार येणार; खासदार श्रीकांत शिंदेंनी व्यक्त केला विश्वास

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार

2019 च्या विधानसभा निवडणुकीत पुण्यातून राष्ट्रवादीने वडगाव शेरी आणि हडपसर या दोन जागा जिंकल्या होत्या. राष्ट्रवादी फुटल्यानंतर दोन्ही आमदार अजित पवार यांच्यासोबत गेले आहेत. अशा परिस्थिती शरद पवार यांची राष्ट्रवादीला हडपस, खडकवासला आणि पर्वती मतदारसंघ मिळणार असल्याची चर्चा आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे

2019 च्या विधानसभा निवडणुका भाजप आणि शिवसेनेने एकत्र लढवल्या होता. मात्र, त्यावेळी शिवसेनेला पुण्यातून एकही जागा लढवता आली नव्हती. येथील सर्व 8 जागा भाजपनेच लढवल्या होत्या. त्यामुळे यंदा महाविकास आघाडीतून उद्धव ठकारे यांच्या शिवसेनेला कमी म्हणजेच 2 जागच मिळतील अशी शक्यता आहे. यामध्ये कोथरूड आणि वडगाव शेरी मतदारसंघांचा समावेश आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com