Machar: आंबेगाव तालुक्यात निघोटवाडी येथे असलेल्या दक्षिणमुखी हनुमान मंदिरात रविवारी (ता.११) सकाळी आश्चर्यकारक घटना घडली. पारायण सोहळा सुरु असतानाच चक्क वानराने मंदिरात प्रवेश केला. भाविक जसे सहजपणे मंदिरात येऊन दर्शन घेतात तसाच प्रकार येथे घडला .
थेट वानर हनुमानरायाच्या गाभार्यासमोर जाऊन उभे राहिले त्याने दर्शनही घेतले नागरिकांनी हा प्रसंग मोबाईल मध्ये कैद केला आहे. नेटकार्याकडून या प्रसंगाचे कौतुक केले जात आहे.
मंचरच्या पश्चिमेला मंचर ते घोडेगाव रस्त्यालगत तीन किलोमीटर अंतरावर निघोटवाडी गाव आहे. येथे पुरातन काळातील जागृत दक्षिणमुखी हनुमान मंदिर आहे. गावातील जवळपास सर्व निर्णय मंदिरातच घेतले जातात .
श्रावण महिना सुरू असल्याने येथे पारायण सोहळा सुरू झाला आहे.रविवारी सकाळी मनोभावे पूजा आरती कार्यक्रम झाला .पारायण सोहळा संपल्या नंतर पसायदान सुरु झाले .
अचानक पणे वानराने मंदिराच्या सभामंडपात प्रवेश केला. थोडावेळ तेथे थांबल्यानंतर थेट दक्षिणमुखी हनुमान गाभार्याच्या दरवाजात वानर गेले. तेथे काही वेळ थांबून हनुमानाच्या मूर्तीकडे दृष्टक्षेप टाकून दर्शन घेतले.
हे दृश पाहून भाविकांनीही हनुमानाचा भक्त असलेल्या वानराचे मनोभावे दर्शन घेतले. त्यानंतर वानर पुन्हा शांतपणे मंदिराबाहेर पडले. अशी माहिती सरपंच नवनाथ निघोट यांनी दिली. वानर हनुमान मंदिरात येते आणि दर्शन घेऊन निघून जाते या विषयी परिसरात जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.