Pune News : घटनेने दिलेला मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी आणि लोकशाहीचा उत्सव साजरा करण्यासाठी मतदार राजा पश्चिम महाराष्ट्रात पोहचण्याचा प्रयत्न करतोय, मात्र त्यांना पुणे-बेंगलोर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय. मतदानापूर्वी मतदारांवर ही वेळ आल्यानं मतदार चांगलाच संतापलाय. काही तास हे मतदार वाहतूक कोंडीत अडकून पडले आहेत.
खेड शिवापूर टोल नाक्यावरून पुण्याकडे जाण्यासाठी आणि पुण्यातून कोल्हापूर,भोर सातारा, सांगली या भागातील मतदारसंघांकडे पोहोचण्यासाठी नागरिक सकाळी घरातून बाहेर पडले आहेत. मात्र शिवापूर टोल नाका येथे तब्बल पाच ते सात किलोमीटरच्या रांगा लागलेल्या आहेत.