वाघोली : येथील श्री क्षेत्र वाघेश्वर देवस्थान मंदिरात शिवलिंगावर बसविण्यासाठी 21 किलो चांदीचा मुखवटा एका भाविकाने बनवून घेतला आहे. तो मुखवटा गुरुवारी अर्पण केला जाणार आहे.
उद्योजक संतोष ज्ञानोबा देशमुख ( पायगुडे ) यांनी आपली आई शैला हिच्या समरणार्थ हा मुखवटा बनवून घेतला आहे. 21 किलो चांदीच्या या मुखवटयाची किंमत 21 लाख रुपये आहे. गुरुवारी ( दि.9 ) रोजी सकाळी मिरवणूक काढण्यात येणार असून होम हवन नंतर हा मुखवटा अर्पण केला जाणार आहे. अशी माहिती वाघेश्वर विकास प्रतिष्ठाणचे अध्यक्ष राजेंद्र सातव व उद्योजक संतोष देशमुख यांनी दिली.
काय आहे वैशिष्ट्ये या मुखवटयाची
● वजन – 21 किलो
● किंमत – 21 लाख
● शुद्ध चांदी पासून बनविलेला
● उंची — 41 इंच
● रुंदी – 26 इंच
● अखंड चांदी पासून व हाताने हा मुखवटा घडविण्यात आला आहे.
● डोळ्यांना जिवंतपणा यावा यासाठी त्यामध्ये लेन्सेस बसविण्यात आले आहे.
● शंकराचा चेहरा, नक्षीच्या पाच फण्यासाहित नागाचे वेठोळे असे त्याचे स्वरूप आहे.
● 15 दिवसात हा मुखवटा घडविण्यात आला. अशी माहिती हा मुखवटा बनविणारे सराफ टी.व्ही अभोणकर यांनी दिली. 95 वर्ष जुनी ही सराफ पेढी असून त्यांनी काळुबाई मंदिर, ओझर गणपती, आळंदी, तुळजाभवानी माता मंदिर येथेही मुखवटे, दागिने घडविले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.