वारजे- शिवणे- कोंढवे धावडे असा मुख्य रस्ता आहे. शिंदे पूल व नवभारत हायस्कूल या दोन्ही तिखटण्यावर(मुख्य रस्त्याला जोडणारा रस्ता तेथे तीन रस्ते असतात ) रोज सकाळी- संध्याकाळी वाहतूक कोंडी होते.
खडकवासला - शिवणे येथील देशमुखवाडी ते वारजे माळवाडीच्या गणपती माथ्याच्या पुढेपर्यंत वाहतूक कोंडी होती. संध्याकाळी साडे सहा वाजता सुरु झाली होती. दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सुमारे सव्वा दोन किलोमीटर अंतर पार करण्यासाठी सुमारे दोन तासाहून वेळ लागला. अखेर नऊ वाजता वाहतूक कोंडी सुटली. हा रस्ता अडीच ते पाऊणे तीन तास रस्ता वाहतुकीच्या दृष्टीने रेडझोन झाला होता. परिणामी वाहनांचा वेग कमी झाला होता.
वारजे- शिवणे- कोंढवे धावडे असा मुख्य रस्ता आहे. शिंदे पूल व नवभारत हायस्कूल या दोन्ही तिखटण्यावर(मुख्य रस्त्याला जोडणारा रस्ता तेथे तीन रस्ते असतात ) रोज सकाळी- संध्याकाळी वाहतूक कोंडी होते. आज संध्याकाळी सव्वा सहा वाजल्यावर अचानक वाहनांचा वेग मंदावला अन कोंडी वाढत गेली. वाहतूक कोंडी अधिक पसरली. अडीच ते पाऊणे तीन तास रस्ता रेड झोन मध्ये होता. परिणामी वाहनांचा वेग कमी झाला होता.
मुख्य रस्त्याला शिवण्यात शिंदे पूल येथे कालव्यावरील रस्ता मिळतो. या रस्त्यालगत शिवणे येथील औद्योगिक क्षेत्र आहे. संध्याकाळी येथील कंपन्यातील कामगार सुटले की, त्यांची वाहने, कंपनीचे साहित्य घेणारे ट्रक- टेंपो एकाच वेळी या कालव्याच्या रस्त्याने येणाऱ्या नागरिकांना वारजेच्या दिशेन जायचे असते. तर काही जणांना उत्तमनगरहून औद्योगिक क्षेत्रकडे जायचे असते. मुख्य रस्ता ओलांडताना कोंडी होत होती.
नवभारत हायस्कूल येथे शिवणे गावठाणातून नांदेड सिटी, नांदेडगाव व सिंहगड रस्त्याला जोडणारा रस्ता मिळतो. येथे नांदेड सिटीकडून येणाऱ्याना वर्जेकडे जायची असते तर उत्तमनगरहून नांदेड सिटीकडे जायचे असते. दोन्ही ठिकाणी सारखी परिस्थिती असते.
वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वारजे वाहतूक विभाग व वारजे माळवाडी, उत्तमनगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी कोंडी सोडवित होते. वाहतूक विभागाचे एक अधिकारी व नऊ कर्मचारी या रस्त्यावर होते. त्यांच्या जोडीला अनेक स्थानिक कार्यकर्ते होते.
शिवणे औद्योगिक क्षेत्र येथे राहणाऱ्या श्रद्धा करपे या दीड किलोमीटरवर शिवणे गावठाण येथे जायचे होते. त्या रिक्षाने सव्वा सहानंतर निघाल्या. कालव्याच्या रस्त्याने शिंदे पूल येथे मुख्य रस्त्यावर आल्या. तेथून वाहतूक कोंडी सुरु झाली. खरोखरच रस्त्यावर पाय ठेवायला जागा नव्हती. नवभारत हायस्कूल येथे पोचण्यास दोन तास लागले.
कोंढवे धावडे येथे राहणाऱ्या शुभांगी सुनील पवार या दुचाकीने सात वाजून ४० मिनीटांनी गणपती माथा येथून निघाल्या. सर्वच वाहनांच्या रांगेत हळूहळू वाहने पुढे सरकत होती. देशमुखवाडी पर्यंत वाहनांच्या रांगा होत्या. दोन किलोमीटर अंतर पार करण्यास ४०- ४५ मिनिटे लागली. रोजच्या पेक्षा जास्त वेळ लागला.
वाहनाच्या रांगा लागलेली माहिती मिळताच कर्मचारी आम्ही शिंदे पूल, कामठे वस्ती, नवभारत हायस्कूल, मुठा नदी जवळ पोचलो. चार पथके स्थानिक नागरिकांच्या मदतीने वाहतूक कोंडी फोडली. शिंदे पूल येथे कामगार सुटलेले होते. शिंदे पूल गणपती माथा दरम्यान पीएमपी बस बंद पडलेली. नवभारत नांदेड सिटीकडून अनेक वहाने येत होती. शिवण्यात नांदेड सिटीच्या रस्त्याला शाळेचे gadring सुरु होते. पालकांची वाहने रस्त्यालगत होती. नऊ वाजता रस्त्यावरील वाहतूक नॉर्मल झाली.
- विशाल पवार, सहायक पोलिस निरीक्षक वारजे, वाहतूक विभाग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.