Pune : पाणी प्रश्नासाठी मुंबईत आंदोलकांनी संत तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांची वेशभूषा करून मागण्यांचा जागर

“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या विरोधात त्यांच्याच जीवाभावाच्या कार्यकर्त्याने सातगाव पठारच्या गेली अनेक वर्ष प्रलंबित असलेल्या पाणी प्रश्नासाठी आंदोलन करणे ही बाब शोकांतिका आहे.
pune protest
pune protest sakal
Updated on

Pune - मुंबई-आझाद मैदान येथे कळमोडी धरणातील पाणी सातगाव पठारासह (ता.आंबेगाव) शिरूर व खेड कोरडवाहू गावांना मिळावे.या मागणीसाठी पुणे जिल्हा परिषदेचे शिवसेनेचे माजी गटनेते देविदास दरेकर यांच्या नेतुत्वाखाली शेतकरी सोमवार (ता.२६) पासून उपोषणाला बसले आहेत.

गुरुवारी (ता.२९) आषाढी एकादशी निमित्त आंदोलकांनी संत तुकाराम महाराज,छत्रपती शिवाजी महाराज यांची वेशभूषा करून मागण्यांचा जागर करत राज्य सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

pune protest
Mumbai Local : भरधाव लोकलमध्ये मुंबईकरांना लटकत करावा लागतोय प्रवास; थरारक Video Viral

“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या विरोधात त्यांच्याच जीवाभावाच्या कार्यकर्त्याने सातगाव पठारच्या गेली अनेक वर्ष प्रलंबित असलेल्या पाणी प्रश्नासाठी आंदोलन करणे ही बाब शोकांतिका आहे.

” अशी खंत देविदास दरेकर यांनी व्यक्त केली. ते म्हणाले “कळमोडी धरणातील पाणी सातगाव पठारला मिळाले पाहिजे. व हुतात्मा बाबू गेनू जलाशयाचा (डिंभे धरण) बोगदा रद्द झाला पाहिजे.हे विठूरायाला आमचे साकडे आहे. आमची मागणी मान्य होऊदे. या मागणीसाठी लढा अजून तीव्र केला जाईल.”

pune protest
Pune : नाणेघाटाजवळील ब्रिटिश कालीन फडके बंधारा तुडुंब

छत्रपती शिवाजी महाराज यांची रुद्र कोकणे यांनी व संत तुकाराम महाराज यांची सुर्यकांत ढमाले यांनी वेशभूषा केली होती. यावेळी सुनिता मुंडे, ताई मुरकुटे, शिवनंदा मुंडे, वंदना मुंडे, जयश्री थोरवत, आपासाहेब तोडकर, योगेश डोंगरे, निलेश कोकणे आदी हातात भगवे ध्वज घेऊन आंदोलनात सहभागी झाले होते. लक्षवेधक आंदोलन पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.