पुणे : नळाला दुर्गंधीयुक्त पाणी; नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर

सय्यदनगरमध्ये अवेळी आणि दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत असल्याने सुमारे २५ हजार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
water
waterSakal
Updated on

उंड्री : सय्यदनगरमध्ये अवेळी आणि दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत असल्याने सुमारे २५ हजार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दुर्गंधीयुक्त पाणी येत असल्याची लष्कर पाणीपुरवठा विभागप्रमुख सुभाष पावरा यांच्याकडे वारंवार लेखी निवेदन दिले आहे. मात्र, अद्याप पाणीपुरवठ्यामध्ये बदल झाला नसल्याने स्थानिक नागरिक कमालीचे त्रासले आहेत, असे प्रा. शोएब शफी इनामदार यांनी सांगितले. याप्रसंगी रहेमान शेख, मुजीब शेख, आयाज शेख, विनायक पाटील, सोहेल लांडगे, उत्तम सोनवणे, शाकिर इनामदार आदी उपस्थित होते.

प्रा. इनामदार म्हणाले की, सय्यदनगर गल्ली नं अ ३, ५, ६, ७, ९, ११, १२, १४, १८, १९, २०, २१, २३, २५, २७ या गल्ल्यांमध्ये दुर्गंधीयुक्त पिण्याचे पाणी येत आहे. रात्री-अपरात्री आणि अनियमित पाणी येत महिलांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. सय्यदनगर रेल्वे गेट क्र.७ येथे नवीन जलवाहिनी टाकली असून, कल्पतरू सोसायटीजवळ नवीन व्हॉल्व्ह बसवला आहे.

water
साडेआठ वर्षापूर्वी केलं होतं पळून जाऊन लग्न; आता घेतला घटस्फोट

येथे नवीन जलवाहिनीला जोड देऊन सय्यदनगर गल्ली नं १ ते ९ करिता पाणी देण्याची व्यवस्था केली, तर पाणीप्रस्न कायम सुटू शकेल. तसेच याच रस्त्यावर सतत पाणी गळती सुरु असल्याने ओलसर आणि निसरड्या रस्त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. पाणी गळती तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, लष्कर पाणीपुरवठा विभागप्रमुख म्हणाले की, दुर्गंधीयुक्त पाण्याची तक्रार आली, त्यावेळी तातडीने भेट देऊन दुरुस्ती केली आहे. आता कोणाची तक्रार आली नाही. मात्र, पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी सय्यदनगरमधील गल्ल्यांमध्ये भेट देऊन पाहणी करून दुरुस्ती केली जाईल. आता सध्या येथील नागरिकांना पहाटेच्या वेळी पिण्याचे पाणी दिले जात आहे, असे त्यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()