Pune : ओढे-नाले बुजविले जात असल्याने महंमदवाडीत पूराचा धोका

आजूनही ठिकठिकाणी ओढ्यात राडारोडा टाकून पात्र अरूंद केले जात आहे.
pune
punesakal
Updated on

हडपसर - महंमदवाडी परिसरातील ओढ्यानाल्यांसह येथील एक पाझरतलावही बांधकाम व्यावसायिकांकडून राडरोडा टाकून बूजविला जात आहे. त्यामुळे पावसाळ्यात याठिकाणी पुराचा धोका निर्माण झाला आहे. पालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याने येथील शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

वडाचीवाडी, उंड्री, महंमदवाडी, जाधवमळा, वाडकरमळा, सय्यदनगर, ससाणेमळा, हिंगणेमळा व हडपसर परिसरातून हा ओढा पुढे मुंढवा येथे मुळा-मुठा नदीला मिळतो. मात्र, परिसरातील बांधकाम व्यवसायीकांकडून ठिकठिकाणी भराव टाकून ओढ्याचे पात्र अरूंद केले गेले आहे.

pune
Pune : ब्रेक फेल झाल्याने बसची सहा वाहनांना धडक; भीषण अपघातात एकजण ठार, तर...

आजूनही ठिकठिकाणी ओढ्यात राडारोडा टाकून पात्र अरूंद केले जात आहे. याशिवाय काही दिवसांपासून या ओढ्यावर वाडकरमळा परिसरात असलेला पाझरतलावही राड्यारोड्याने बूजविला जात आहे. बांधकामासाठी होत असलेल्या खोदकामातून निघालेले मोठ्याप्रमाणातील दगड, माती, मुरूम या तलावात सर्रासपणे टाकले जात आहे. त्यामुळे येथील शेती व रहिवाशांना पुराचा धोका निर्माण झाला आहे.

pune
Mumbai : एसी लोकल, मोनो, मेट्रोमध्ये लगेज डब्यांची व्यवस्था करा! मुंबई डबेवाला असोसिएशनची मागणी

शेतीसाठी उपयोगात येणाऱ्या पाण्याच्या स्रोतांनाही धोका निर्माण झाला आहे. ही बाब पालिकेला कळवूनही कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्याची तक्रार येथील शेतकरी विठ्ठल वाडकर, मच्छिन्द्र वाडकर, गजानन वाडकर, सागर वाडकर, गुलाब वाडकर, हर्षल जाधव, सागर जाधव, सचिन डांगमाळीयांनी केली आहे.

pune
Pune Water Close : दक्षिण पुण्यातील पाणी बंदसाठी स्वतंत्र नियोजन

"पाझर तलाव बुजविला जात असल्यामुळे येथील विहिरींचे पाणी कमी झाले आहे. ओढा अरूंद झाल्याने पावसाळ्यात शेतीला व घरांना पूराचा धोका निर्माण झाला आहे. संबधीत विभागाने ओढ्याची पूर रेषा निश्चित करून त्यावर सीमाभित बांधावी.'

विठ्ठल वाडकर, स्थानिक शेतकरी

"वाडकरमळा-जाधवमळा परिसरातूंन वाहनाऱ्या ओढ्यावर ब्रिटीशकालीन बंधारा आहे. आमच्यासह मळ्यातील गावकरी येथे विहीर बागायत करीत आहोत. या विहिरी व इंथनविहिरींसाठी पाण्याचा स्रोत म्हणून हा बंधारा उपयुक्त ठरत आहे. मात्र, सध्या या तलावात राडारोडा टाकून बुजवला जात आहे. पालिका व लघुपाटबंधारे विभागाने त्याबाबत लक्ष घालून कारवाई केली जावी.'

विजया वाडकर, माजी नगरसेविका

pune
Mumbai : हेदुटणे येथे एमआयडीसीची पाईपलाईन फुटली; ऐन उन्हाळ्यात लाखो लीटर पाण्याची नासाडी

"हा ओढा हडपसर व वानवडी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीवर आहे. बांधकाम व्यवसायिकाने हा ओढा व त्यावरील बंधाऱ्यात राडारोडा टाकल्याच्या तक्रारी आलेल्या आहेत. त्याची पाहणी करून कारवाई केली जाईल.'

श्याम तारूसहाय्यक आयुक्त, वानवडी क्षेत्रीय कार्यालय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()