Waterlab Solutions Startup : बोअरवेलच्या तळाचा ठाव घेणारे संशोधन; ‘वॉटरलॅब सोल्यूशन्स’चे स्टार्टअप

शेती, पिण्यासाठी पाणी, व्यावसायिक कामे याच्यासह विविध कामांसाठी आपल्या देशात मोठ्याप्रमाणात बोअरवेलचा वापर केला जातो.
Vijay Gawade
Vijay Gawadesakal
Updated on

पुणे - शेती, पिण्यासाठी पाणी, व्यावसायिक कामे याच्यासह विविध कामांसाठी आपल्या देशात मोठ्याप्रमाणात बोअरवेलचा वापर केला जातो. बोअरवेल बंदिस्त असल्याने त्याची जलक्षमता किती आहे, हे कळणे कठीण असते. त्यामुळे बोअरवेल कोरडे होईपर्यंत सतत पंपिंग करून पाणी उपसले जाते. तसे झाल्याने पाण्याचे व्यवस्थापन करणे काहीसे मुश्‍कील होऊन जाते.

बोअरवेलचा वापर करीत असलेल्यांची हीच समस्या लक्ष करीत पुण्यात एका अनोख्या स्टार्टअपची स्थापना करण्यात आली आहे. भूजल पातळीबाबतचे अज्ञान आणि बोअरवेलचे अकार्यक्षम व्यवस्थापन, यामुळे उपलब्ध पाण्याचा वापर योग्यप्रकारे होत नाही. वॉटरलॅब सोल्यूशन्स (Waterlab Solutions) या स्टार्टअपने ही आव्हाने समजून घेते, त्यावर उपाय शोधला आहे. देशातील बोअरवेलच्या कार्यक्षम व्यवस्थापनासाठी यंत्र विकसित करण्याच्या उद्देशाने गेल्या ३३ वर्षांपासून पाणी या विषयात कार्यरत असलेले विजय गावडे यांनी २०१९ मध्ये वॉटरलॅबची स्थापना केली. वॉटरलॅबने पहिले भूजल बोअरवेल मॉनिटरिंग अॅप तयार केले आहे.

Vijay Gawade
Property Tax : अद्यापही पुणे महापालिकेतील दीड लाख नागरिक मिळकतकर बिलाच्या प्रतिक्षेत

जे व्यक्ती, समुदाय, व्यावसायिक आणि संस्थात्मक वापरकर्त्यांसाठी सहजपणे उपलब्ध केले आहे. वॉटरलॅबला केंद्र सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने अनुदान दिले आहे. स्टार्टअपची गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयाने तंत्रज्ञान आणि अंमलबजावणी भागीदार म्हणून सरकारच्या अमृत दोन अभियानासाठी निवड केली आहे. यात सुमारे ५०० शहरांना जलसुरक्षा देण्याचे उद्दिष्ट आहे. जयपूरमधील सीसीएस एनआयएएम येथे आणि नाबार्ड अॅग्री फाउंडेशनसह आयआयटी, खडगपूर येथे वॉटरलॅब कार्यरत आहे.

कसे काम करते?

पाणी आणि जलस्रोत व्यवस्थापनासाठी इंटरनेट ऑफ थिंग्ज आणि डोमेनच्या आधारावर वॉटरलॅब सोल्यूशन्स नावीन्यपूर्ण डिजिटल सोल्यूशन्स व सल्ला पुरवते. तसेच स्टार्टअपने तयार केलेल्या मशिनच्या माध्यमातून बोअरवेलच्या पाण्याची खोलीदेखील मोजता येते. त्यामुळे आपल्याकडे किती पाणी शिल्लक आहे, याचा अंदाज बोर मालकाला मिळतो. नव्याने खोदलेल्या किंवा जुन्या बोअरवेलची पाण्याची उपलब्धता तपासण्यासाठी, शेती आणि घरगुती बोअरवेलचे निरीक्षण करण्यासाठी तसेच पाणी वर खेचण्यासाठी योग्य पातळीवर बोअरवेल पंप लावण्यासाठी या स्टार्टअपच्या यंत्राचा वापर केला जातो.

Vijay Gawade
Land Acquisition : बोपोडीत महानगरपालिकेची भूसंपादन कारवाई

बोरमध्ये पाणी किती आहे हे समजले तर त्याचा वापर कसा करायचा हे समजते. उन्हाळ्यात हे नियोजन महत्त्वाचे ठरते. देशातील काही भाग असे आहेत की जेथे उन्हाळ्यात जनावरांसाठीदेखील पाणी नसते. अशा ठिकाणी हे नियोजन महत्त्वाचे ठरते. धरणांमधील पाण्याचे नियोजन ही सरकारची जबाबदारी आहे. मात्र, आपण आपल्याकडे असलेल्या पाण्याचे नियोजन कसे करायचे यावर मी संशोधन केले. त्यातून लक्षात आले की त्यासाठीचे माध्यम उपलब्ध नाही. त्यासाठी स्टार्टअपची स्थापना केली.

- विजय गावडे, संस्थापक, वॉटरलॅब सोल्यूशन्स

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()