Pune : आम्हाला संसदेत बोलूच दिले जात नाही ! खासदार वंदना चव्हाण यांनी व्यक्त केली मनातील खदखद

आरोग्य सेनेच्यावतीने "मुल्याधिष्ठीत राजकारण आणि लोकशाहीचे काय ? " या विषयावर पत्रकार भवन येथे परिसंवाद आयोजित करण्यात आला होता.
Pune
PuneSakal
Updated on

Pune - "संसदेत आम्ही महागाई, बेरोजगारी, आर्थिक विषमता, हिंसाचार,अशा प्रश्नांवर बोलण्यासाठी अक्षरशः धडपडत असतो, अनेक महत्वाच्या प्रश्नांविषयी बोलण्यासाठी आम्ही नोटीस काढतो, तरीही आम्हाला ही संसदेत बोलू दिले जात नाही.

पेगेसिस, राफेल, पंतप्रधान निधी याबद्दल तर संसदेत प्रश्नच विचारायचे नाहीत, अशी सध्याची स्थिती आहे.सत्ताधाऱ्याकडून असे केले जात जाणार असेल, तर आम्ही दाद मागणार कुठे ? या प्रकारामुळे आमचे मन अक्षरशः अस्वस्थ होत आहे. ", हे शब्द आहेत, खासदार वंदना चव्हाण यांचे !

आरोग्य सेनेच्यावतीने "मुल्याधिष्ठीत राजकारण आणि लोकशाहीचे काय ? " या विषयावर पत्रकार भवन येथे परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. तेव्हा यावेळी खासदार वंदना चव्हाण, माजी आमदार उल्हास पवार, आरोग्य सेनेचे प्रमुख अभिजित वैद्य यावेळी उपस्थित होते.

Pune
Mumbai : मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील उपाययोजनेचा बोजवारा; जानेवारी ते जून दरम्यान एकूण ७० अपघातामध्ये ३७ मृत्यू

चव्हाण म्हणाल्या," लोकशाहीची जननी असलेली भारतातील लोकशाही आता धोक्यात आहे. असे असूनही मुख्य प्रवाहातील माध्यमे काहीच बोलत नाहीत. सरकार विरोधात बोलले की तुरुंगात पाठविले जाते. विरोधात बोलणारे विचारवंत, कलाकार, पत्रकार, राजकीय व्यक्ती यांना थेट तुरुंगात पाठविले जात आहे. संजय राऊत, अनिल देशमुख यांच्यानंतर नवाब मलिक यांना अटक करून दहशतवावाद्या सारखी वागणूक दिली.

सर्वसामान्य लोकांचे प्रश्न, त्यांच्या पैशाबद्दल ही आम्हाला संसदेत बोलू दिले जात नाही. सध्या केवळ 1 टक्का भारतीयाकडे देशातील बहुतांश संपत्ती आहे. ते देशाचे दरडोई आर्थिक उत्पन्न (जीडीपी) वाढत आहे, असे आम्हाला सांगितले जात आहे, तसे असेल तर मग आजही गरीबी, बेरोजगारी सारखे प्रश्न का सुटत नाहीत, असा आमचा प्रश्न आहे.मणिपूर हिंसाचार थांबत नाही, महिला कुस्तीपटू न्यायासाठी लढत आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत मोदी बोलत नाहीत. लोकांनी निवडून दिलेले सरकार फोडून नवे सरकार बनवले जात आहेत.हे देशासाठी धोकादायक आहे."

Pune
Mumbai Crime : मीटरने जाण्यास रिक्षाचालकाने दिला नकार! तक्रारीनंतर मुंबई पोलिसांची त्वरित अॅक्शन | Video Viral

डॉ.बाबा आढाव म्हणाले, "हिंदू राष्ट्र करण्याचा त्यांचा अजेंडा आहे. नितीमूल्ये अक्षरशः पायदळी तुडवून साम, दाम, दंड, भेदाचा सर्रास वापर करीत नागरिकांवर दबाव आणून अप्रत्यक्षरित्या आणीबाणी लादली जात आहे.

म्हणूनच किरकोळ राजकीय सत्तेसाठी आघाड्या करून आता चालणार नाही. घटनेतील भारत निर्माण करायचा असेल तर आपल्याला आपली भूमिका स्पष्ट, रोखठोकपणे मांडली पाहिजे, त्यासाठी सध्या घडणाऱ्या घटना विरोधी प्रकराविरुद्ध आवाज उठविला पाहीजे. फक्त तुरुंगच भरले पाहिजेत, असे नाही तर सध्या घडणाऱ्या घटना विरोधात वेगवेगळ्या उपक्रमाद्वारे रस्त्यावर उतरून उत्तर दिले पाहिजे."

Pune
Mumbai : धारावीच्या पुनर्विकासाची जबाबदारी अदानी समूहाकडे! महाराष्ट्र सरकारने दिली अंतिम मंजूरी

उल्हास पवार म्हणाले, "लोकशाही साठी आपण संघर्ष करत आहोत. सध्या सरंजामशाही सुरू असल्याची सद्यस्थिती आहे. आताची स्थिती ही भीतीदायक आहे. आता काही व्यक्तींचे उदात्तीकरण केले जात आहे, त्यामुळे ते खरे काय आहेत याची अभ्यासपूर्ण मांडणी केली जात आहे. त्यामुळे त्यांचा आवाज बंद होत आहे. लोकशाही दाबण्यासाठी प्रयत्न होत आहे, त्याविरुद्ध सर्वांनी लोकांनी एकत्र येऊन आवाज उठविला पाहिजे, तरच हे चित्र बदलू शकेल."

Pune
Mumbai News : पाकिस्तानी सीमाला परत द्या, अन्यथा मुंबईत घातपात; पोलिसांना अज्ञाताकडून धमकीचा कॉल

तुमच्या बंदुकीत तेवढ्या गोळ्या आहेत का ?

"माध्यमे, सीबीआय, ईडी, रॉ यांसारख्या संस्था "गारदी" स्वरूपाचे काम करीत आहेत. आम्ही प्रखर विरोध केला, तर आम्हाला " तुमचा ही दाभोलकर करू" असे आम्हाला धमकी दिली जात आहे. श्रीपाल सबनीस यांना "मॉर्निंग वॉकला सांभाळून जा" अशी धमकी दिली,

तेव्हा आम्ही "मॉर्निंग वॉक वुईथ श्रीपाल सबनीस" उपक्रम केला. आम्ही अमर्याद दाभोलकर निर्माण करू, तुमच्या बंदुकित तेवढ्या गोळ्या आहेत का ? याचा विचार करा." असे स्पष्ट विचार डॉ.अभिजित वैद्य यांनी मांडले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.