Pune News : शहर आणि परिसरात पूर्वमोसमी पावसाचा प्रभाव आता ओसरल्याने पुन्हा उन्हाचा चटका वाढू लागला आहे. शहरात गेल्या तीन दिवसांपासून सातत्याने कमाल तापमानाचा पारा वाढत ३७.५ अंश सेल्सिअस नोंदला. पुढील तीन दिवसांमध्ये आकाश निरभ्र होणार असल्याने कमाल तापमानाचा पारा परत चाळिशीपर्यंत उसळी मारेल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला.
शहरात शनिवारी (ता. ११) आणि रविवारी (ता. १२) धुवांधार पाऊस झाला. वळिवाच्या या पावसामुळे शहरात चाळीशीपार गेलेला कमाल तापमानाचा पारा ३१ अंश सेल्सिअसपर्यंत कमी आला.
उन्हाच्या चटक्याने होरपळणाऱ्या पुणेकरांना गेले दोन-तीन दिवस थोडा दिलासा मिळत होता, पण आज पुन्हा शहरात उन्हाचा चटका वाढला. कमाल तापमानाचा पारा सरासरी इतका परत नोंदला गेला. शिवाजीनगर येथे कमाल तापमान ३७.५ अंश सेल्सिअस नोंदले गेले, तर, लोहगाव येथे ३६.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
शहर आणि परिसरात येत्या गुरुवारी (ता. १६) दुपारपर्यंत आकाश मुख्यतः निरभ्र राहणार असून, त्यानंतर ढगाळ होईल. मेघगर्जनेसह पावसाच्या हलक्या स्वरुपातील सरी पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली.
त्यानंतर पुढील दोन दिवस आकाश मुख्यतः निरभ्र राहणार असल्याने उन्हाचा चटका वाढेल. पुण्यात येत्या शुक्रवारी (ता. १७) आणि शनिवारी (ता. १८) ३९ अंश सेल्सिअसपर्यंत कमाल तापमान वाढेल, तर रविवारी (ता. १९) ४० अंश सेल्सिअसपर्यंत पारा उसळी मारेल.
तारीख - कमाल तापमान (अंश सेल्सिअस)
११ - ३७.८
१२ - ३१.४
१३ - ३६.३
१४ - ३७.१
१५ - ३७.५
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.