Pune Weather Update : पुण्यासह मध्य महाराष्ट्रात अवकाळीची शक्यता; बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ

सकाळी धुके आणि दुपारनंतर पावसाची शक्यता; कमाल तापमानही ३१ अंशापर्यंच पोचले
Pune Weather Update
Pune Weather UpdateSakal
Updated on

Pune News : बंगालच्या उपसागरात तयार होऊ घातलेल्या चक्रीवादळामुळे पुण्यासह कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच रविवारी (ता.२६) उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

शहरात गुरुवारी (ता.२३) सकाळपासूनच कमाल तापमानात घट झाल्याचे पाहायला मिळाली. दुपारनंतर आकाश अंशतः ढगाळही होते. शहरातील सरासरी किमान तापमान १६ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त होते.

तर कमाल तापमानही ३१ अंशापर्यंच पोचले होते. पुढील चार दिवस शहरासह जिल्ह्यातच आकाश मुख्यतः ढगाळ आणि सकाळी धुके पडण्याची शक्यता आहे. तर दुपारनंतर मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

पूर्वेकडून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांचा पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्यांशी संयोग होऊन कोकण- गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, मध्य प्रदेशचा नैऋत्य भाग आणि गुजरातच्या काही जिल्ह्यांमध्ये २४ ते २७ नोव्हेंबर दरम्यान काही ठिकाणी दुपारनंतर हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

२६ तारखेला उत्तर मराठवाडा आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसासह गारपिटीचीही शक्यता आहे. याच दिवशी मध्य महाराष्ट्रात इतरत्र आणि कोकणातही पावसाचे प्रमाण जास्त असेल.

हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार,‘‘ दक्षिण अंदमानच्या समुद्रात २६ नोव्हेंबरला कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता असून, २७ तारखेला त्याची तीव्रता वाढून डिप्रेशनमध्ये रूपांतर होईल. हे क्षेत्र वायव्येकडे सरकून त्याची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे.’’

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी घ्यावी काळजी

- सोमवार (ता.२७) पर्यंत काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता

- ढगाळ हवामान कायम राहणार असल्याने शेती व हवामानावर आधारित उद्योगांनी विशेष काळजी घ्यावी

- गारपीटीची शक्यता उत्तर महाराष्ट्रात वर्तवली आहे, पुणे जिल्ह्यात नाही. मात्र, तरीही मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे

- थंडी आता आठवडाभर कमी होईल, ढगाळ वातावरण वाढेल, त्या दृष्टीने शेतीचे नियोजन करावे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.