पुणे - महापालिकेने (Municipal) लॉकडाऊनचे (Lockdown) निर्बंध शिथिल केले असले तरी शनिवारी व रविवारी विकेंड (Weekend) लॉकडाऊन कायम आहे. त्यामध्ये हॉटेल, रेस्टॉरंट, बार बंद राहणार आहेत. केवळ पार्सल सुविधा (Parcel Service) सुरू असणार आहे, असे अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल (Rubal Agarwal) यांनी स्पष्ट केले. (Pune Weekend Hotel Restaurant Bar Close Only Parcel Sevice Continue)
महापालिकेने शुक्रवारी (ता. ११) निर्बंध शिथिल झाल्याची नवीन आदेश काढले आहेत. त्यामध्ये सोमवारपासून (ता. १४) अत्यावश्यक सेवेची दुकाने सर्व दिवस सायंकाळी सात पर्यंत खुली राहणार आहेत. तर अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार सायंकाळी ७ पर्यंत सुरू राहणार आहे.
हॉटेल ५० टक्के क्षमतेने रात्री १० पर्यंत खुली ठेवण्यास परवानगी दिली आहे. तर पार्सल सेवा रात्री ११ पर्यंत सुरू राहणार आहे. तसेच ५० टक्के क्षमतेने मॉल सुरू होणार आहेत. पण हॉटेल व मॉल शनिवारी व रविवारी सुरू राहणार की बंद याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. त्याबद्दल नागरिकांकडून चौकशी देखील सुरू होती. मात्र, अतिरिक्त आयुक्त अग्रवाल यांनी हॉटेल बंद असतील असे स्पष्ट केले आहे.
महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, ‘विकेंड लॉकडाऊनला केवळ अत्यावश्यक दुकाने सुरू राहतील. हॉटेल, मॉल पूर्णपणे बंद असतील. हॉटेलची पार्सल सेवा सुरू राहील.’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.