Cycle City Pune: 'सायकल सिटी' म्हणून ओळख असणारं पुणे ट्रॅकच्या बाहेर का पडतंय? उदासीनतेची 'ही' आहेत कारणं

त्यामुळे आदर्श शहरांच्या वाहतूक आराखड्यात रस्ते, बीआरटी, पदपथ यांच्यासह सायकल ट्रॅकलाही महत्त्वाचे स्थान असते.
सायकल ‘ट्रॅक’बाहेर
सायकल ‘ट्रॅक’बाहेरSakal
Updated on

Cycle City Pune - ‘‘गेल्याच वर्षी मला गिअरची नवी सायकल गिफ्ट मिळाली. मला सायकलवरूनच शाळेत जायचं आहे, पण आई-बाबा परवानगी देत नाहीत. ते दोघं त्यांच्या मित्र-मैत्रिणींसह शाळेत सायकलवरून कसे जायचे, याचे किस्से मला अगदी रंगवून सांगतात.

मला मात्र सायकल असूनही ती वापरू देत नाहीत, असं का?’’ असा रोखठोक प्रश्न आहे कुणाल (नाव बदलले आहे) या १४ वर्षीय मुलाचा! अाणि कुणालच्या पालकांचे उत्तर, ‘‘पुण्यातले रस्ते आता सायकल चालवण्यासाठी कुठे सुरक्षित आहेत? वाहनांच्या गर्दीत मुलांना सायकलवर पाठविण्याच्या कल्पनेनेच आम्हाला धडकी भरते.’’

सायकल ‘ट्रॅक’बाहेर
Pune: आळेफाटा पोलिसांमुळे मिळाले, चोरीला गेलेले चार तोळयाचे मंगळसुत्र

हीच भावना सध्या पुण्यातील असंख्य पालकांची आहे. मात्र वाहनांची संख्या हे यामागील खरे कारण नाही तर, शहराच्या वाहतूक व्यवस्थेत सायकलस्वारांना असलेले दुय्यम स्थान, हे कारण आहे. खरेतर शहर आणि नागरिकांच्या आरोग्यासाठी सायकल चालवणे,

हे फायदेशीरच. त्यामुळे आदर्श शहरांच्या वाहतूक आराखड्यात रस्ते, बीआरटी, पदपथ यांच्यासह सायकल ट्रॅकलाही महत्त्वाचे स्थान असते. पुण्यातही असे ट्रॅक आहेत. मात्र, त्यांची अवस्था सायकल चालवण्याजोगी आहे का, याचे उत्तर नाही असेच आहे.

जीव मुठीत धरून गर्दीतून वाट

वाहनांचे अतिक्रमण, खंडित झालेले ट्रॅक, ठिकठिकाणी येणारे अडथळे, दिशादर्शक फलकांचा अभाव आदी कारणांमुळे शहरातील सायकल ट्रॅक सध्या वापराविनाच आहेच. शाळकरी मुले, कष्टकरी वर्गातील कामगार आणि आरोग्यासाठी किंवा अन्य कारणाने नियमित प्रवासासाठी सायकलची निवड करणारे व्यक्ती, हे तीन घटक सायकलचा वापर करतात.

यातील कोणालाही शहरात एका ठिकाणाहून दुसरीकडे जाताना सलगपणे ट्रॅकचा वापर करता येत नाही. महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून बांधलेल्या अनेक ट्रॅकची दुरवस्था झाली आहे. प्रशासनाला या प्रश्‍नाचे गांभीर्यच नसल्याने कोणत्याही ट्रॅकची देखभाल-दुरुस्ती करण्याची तसदीही घेतली जात नाही.

सायकल ‘ट्रॅक’बाहेर
Mumbai Local Train : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी लोकल विलंबाने !

शहरातील सायकल ट्रॅकबद्दल महापालिकेलाच माहिती नाही. आजघडीला ट्रॅक कशाला म्हणायचे, हाच खरा प्रश्न आहे. महापालिका प्रशासन उदासीन असल्याचा फटका ट्रॅकला बसतो आहे.

केवळ भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनांसाठी प्रशस्त रस्ते बांधायचे, म्हणजे वाहतुकीचा प्रश्न सुटेल, असा प्रशासनाचा दृष्टिकोन आहे. मात्र जितके रस्ते मोठे होतील, तितकी वाहने वाढत जातील आणि वाहतुकीची समस्या कधीच सुटणार नाही, हे जगभरात सिद्ध झाले आहे. मात्र पादचारी, सायकलस्वारांना आपल्या वाहतूक आराखड्यात स्थानच नाही.

- रणजित गाडगीळ, संचालक, ‘परिसर’ संस्था

पुण्याचे रस्ते सायकलस्वार, धावपटू, पादचाऱ्यांसाठी अजिबातच योग्य नाहीत. तुम्हाला सायकल चालवायची असेल तर पहाटे लवकर बाहेर पडणे, हाच एकमेव पर्याय असतो. परदेशात मात्र पादचारी आणि सायकलस्वारांचा प्राधान्याने विचार केला जातो.

ॲमस्टरडॅममध्ये तर सायकल ट्रॅकची रुंदी अधिक आणि वाहनांसाठीच्या रस्त्यांची रुंदी कमी, अशीही परिस्थिती पाहायला मिळते. जर्मनीमध्ये सायकल ट्रॅकवर कोणीही चुकून वाहन घेऊन गेले, तरी ते रागवतात.

आपल्याकडे मात्र अतिक्रमणे, पार्किंग, खड्डे अशा अनेक समस्यांमध्ये सायकल ट्रॅकची दुर्दशा झाली आहे. आपल्या आरोग्यासाठीच नाही, तर संतुलित पर्यावरणासाठीही सायकलचा वापर आवश्यक आहे.

- विभावरी देशपांडे, अभिनेत्री

सायकल ‘ट्रॅक’बाहेर
Pune News : महिला उद्योजकांच्या व्यवसाय वाढीसाठी ‘नवनी’चे पाठबळ

महापालिकेचे दुर्लक्ष

१ शहराचा सायकल आराखडा, अर्थात ‘पुणे सायकल प्लॅन’ हा २०१७ मध्येच मंजूर झाला होता. नागरिकांच्या सूचना मागवून, सर्व प्रभाग समित्यांसमोर सादरीकरण करून अंतिम केल्यानंतर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत त्याला मंजुरी मिळाली. मात्र कागदावर भक्कम असलेल्या या आराखड्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी प्रभावीपणे झालीच नाही.

२ शहरभर सायकल मार्गांचे जाळे निर्माण करणे, ही या आराखड्यातील महत्त्वाची बाब होती. सुमारे ८२४ किलोमीटर लांबीचे ट्रॅक प्रस्तावित होते. मात्र आतापर्यंत झालेल्या ट्रॅकपैकी फक्त ९५ किलोमीटरचेच ट्रॅक अस्तित्वात आहेत.

३ यातील अनेक ट्रॅकची दुरवस्था झाल्याने ते वापरण्याजोगे नाहीत. शहरातील किती किलोमीटर लांबीचे ट्रॅक अस्तित्वात आहेत आणि वापरण्यायोग्य आहेत, याची पुरेशी माहिती महापालिकेकडे मागितल्यानंतरही मिळाली नाही.

कर्वे रस्ता
कर्वे रस्ताSakal
सेनापती बापट रस्ता
सेनापती बापट रस्ता Sakal
सातारा रस्ता
सातारा रस्ताSakal
जुना पुणे-मुंबई महामार्ग.
जुना पुणे-मुंबई महामार्ग. Sakal
नगर रस्ता
नगर रस्ताSakal
सिंहगड रस्ता
सिंहगड रस्ताSakal

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.