Pune : समाजातील विधवा महिलांना सन्मान मिळाला पाहिजे; रेश्मा पाटील, मुक्ता द वॉक फॉर एम्पॉवरमेंट ऑफ विधवा कार्यक्रम

मुक्ता द वॉक फॉर एम्पॉवरमेंट ऑफ विधवा कार्यक्रमाचे रियान प्रॉडक्शनच्या वतीने महाराष्ट्र नेक्स्ट फॅशन सुपर मॉडेल मिस्टर, मिस, मिसेस, किड्स-2023 फॅशन शोचे आयोजन दिग्दर्शक शंकर भडकवाड यांनी केले होते.
Pune
Punesakal
Updated on

Pune - विधवा महिलांना आजही समाजामध्ये मानाचे स्थान मिळत नाही, तसेच त्यांच्याकडे एक दुर्लक्षित घटक म्हणून पाहिले जाते त्यांना मान-सन्मान मिळाला पाहिजे, या भावनेतून फॅशन सुपरमॉडेल कार्यक्रम सुरू केला आहे, असे स्पष्ट मत महाराष्ट्र नेक्स्ट फॅशन सुपर मॉडेल-2023च्या संस्थापिका रेश्मा बिपीन पाटील यांनी व्यक्त केले. मुक्ता या कार्यक्रमात समाजातील विधवा व अविवाहित महिलांना प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली.

Pune
Pune : सिंहगडावर पुन्हा ई-बस सुरू करण्याच्या हालचालींना वेग; पीएमपीएमएलच्या पथकाने केली घाट रस्त्याची पाहणी

मुक्ता द वॉक फॉर एम्पॉवरमेंट ऑफ विधवा कार्यक्रमाचे रियान प्रॉडक्शनच्या वतीने महाराष्ट्र नेक्स्ट फॅशन सुपर मॉडेल मिस्टर, मिस, मिसेस, किड्स-2023 फॅशन शोचे आयोजन दिग्दर्शक शंकर भडकवाड यांनी केले होते. विमान नगर नोव्हेटल हॉटेल येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी मराठी सिनेअभिनेते आदिनाथ कोठरे,

श्रेयश जाधव, सुशांत पुजारी, दीपक मानकर, गिरीश मानकर, आहान देवाडिगा, रियान प्रॉडक्शनचे ब्रँड अॅम्बेसेडर रोहित शिंदे, किरण नाईकडे-पाटील, रियान पाटील उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये 50हून अधिक मॉडेल्सनी सहभाग घेतला होता.

Pune
Mumbai Crime : 7 वर्षांच्या चिमुरडीचा विनयभंग; आरोपी सुरक्षा रक्षकाला अटक

यावेळी आदिनाथ कोठारी यांनी या आगळ्या वेगळ्या झालेल्या कार्यक्रमाचे कौतुक करत महिलांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. ज्युरीमध्ये पंकज शर्मा, रोहित शिंदे मिताली धूत, अक्षय अधिक, प्रसिध्दी पोटे, आशिष शिंदे, शिवस्टॉपर हृषिकेश कांबळे नील आणि नीलिमा अवसरमोल, वैदेही, निधी अग्रवाल आणि अँगल भारद्वाज यांनी रॅम्प वॉकरमध्ये उत्तम कामगिरी बजावली. या शोमध्ये 45 स्पर्धकांमधून पंकज शर्मा, रोहित शिंदे, वैभव बच्चे, मितली धूत आणि अक्षय मोरे यांनी 12 विजेत्यांची निवड केली.

Pune
Pune News पुण्यातील या भागात होतेय दुरुस्त-नादुरुस्त गाड्यांचे पार्किंग

शंकर भडकवाड म्हणाले की, आजही समाजामध्ये विधवा महिलांना मोठा संघर्ष करावा लागत आहे. समाजामध्ये मतभिन्नता आहे. मुक्ताची टीम समाजातील विधवांना समर्पित आहे, असे त्यांनी सांगितले.पंजाबी ड्रेस व साडी व्यतिरिक्त आज पर्यंत कधीच वेस्टन कपडे परिधान करून घराबाहेर पडले नाही. माझे लग्न झाले नाही परंतु आतापर्यंत विवाहित महिलांवर होणारे अन्याय अत्याचारा बाबत महिला सक्षमीकरणाचे काम करीत आहे.

Pune
Mumbai : रेल्वेचे ईमर्जन्सी ब्रेक कसे दाबायचे ? लोको पायलटच्या ट्रेनिंगसाठी CSMT मध्ये खास मशीन

बुधवार पेठेतील रेड लाईट एरिया मध्ये अलका फाउंडेशनच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून अध्यक्ष म्हणून काम करीत आहे. तसेच पुणे मनपाच्या समाज विकास विभागात समूह संघटिका म्हणून काम करत आहे. रीयान च्या माध्यमातून नव्याने हे व्यासपीठ मिळाल्याचा आनंद यावेळी स्पर्धेत सहभागी असलेल्या अलका गुंजनाळ ने आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()