Aditi Tatkare : महापर्व बक्षिस जिंकण्याचे..मंगलमय पैठणी साड्यांचे, या उपक्रमांतर्गत माळेगावात महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांच्यासह हजारो महिलांच्या उपस्थितित अनेक महिला स्पर्धकांनी कला-गुणांचे लक्षवेधी प्रदर्शन केले.
माझी वसंधरा अभियान, स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत नागपंचमी सणाचे औचित्य साधत माजी सरपंच दीपक तावरे, राधा आकाश तावरे यांनी महिलांसाठी विविध स्पर्धा घेतल्या होत्या. विशेषत: मंत्रीमहोदय अदिती तटकरे यांच्या हस्ते वरील यशस्वी महिलांचा सन्मान झाला. यावेळी स्पर्धकांबरोबर उपस्थित महिलाचा उत्साह पाहून तटकरेही कमालिच्या भारावल्याचे दिसले.
माळेगाव (ता.बारामती) येथे नागपंचमी सणाचे औचित्य साधून दीपक तावरे, राधा आकाश तावरे व नागेश्वर प्रतिष्ठाणच्या पुढाकाराने महिला-मुलींच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी `खेळ पैठणीचा` हा स्पर्धात्मक कार्य़क्रम १ हजार पेक्षा अधिक महिलांच्या उपस्थित शुक्रवार (ता.९) रोजी पार पडला.यावेळी नव्याने पीएसआय पदाला गवसणी घातलेल्या मोनिका येळे, उत्कर्षा गावडे, एसआरपी शौनक दुरूगुडे यांचीही उपस्थिती अक्षरशः लक्षवेधी ठरला.
या वेळी महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे, अभिनेते रामभाऊ जगताप, प्रा.लक्ष्मण भोसले, सौ. प्रतिभा तावरे, सौ.स्नेहलता ठोंबरे, अॅड.गायत्री राहुल तावरे, सौ.ज्योती लडकत आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी मंत्री तटकरे यांच्या हस्ते मानाची पैठणी जिंकलेल्या रामेश्वरी विकास कानतोडे यांचा सन्मान झाला.
याशिवाय तन्वी संतोष जाधव, शितल राहुल शिंदे, पुजा आकाश बनसोडे, निलम सचिन काटे, गौरी रजनीकांत पवार, दिपाली नवनाथ जाधव, राजश्री सुधीर लोणकर या स्पर्धकांना अनुक्रमे फ्रिज, टिव्ही, सोन्याची नथ, मिक्सर, हेअर डाय, मिनी पैठणी साड्या देण्यात आल्या. याशिवाय स्पर्धात्मक सहभागी सुमारे ८०० महिलांना पर्स व टिपीन डबा मोफत भेट देण्यात आले.
मंत्री तटकरे म्हणाल्या,`` महिला जर खंबीर आणि निर्णय घेण्यामध्ये तत्पर असले, तर लोकही अशा महिलांच्या कायम पाटीशी असतात. त्यामुळे अधिकाधिक महिलांच्या कला-गुणांना वाव मिळवा, त्यांना अर्थिक संपन्न करण्यासाठी माळेगाव-बारामतीसह राज्यात अनेक उपक्रम हाती घेतले जातात.
अर्थात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणविस यांचे सरकारमधील महिला व बालकल्याण विभागानेही विविध योजना यशस्वी केल्या आहेत. त्यापैकी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सध्याला लक्षवेधी ठरली आहे. त्याचा अधिकाधिक महिलांनी लाभ घेण्यासाठी पुढे यावे,`` असे आाहन त्यांनी केले. यावेळीच वेळी अनेक महिलांनी टाळ्यांच्या गजरात लाडकी बहिण योजनेचे स्वागत केले. प्रास्ताविक राधा तावरे यांनी केले, तर सूत्रसंचालन लक्ष्मण भोसले व आभार प्रणव तावरे यांनी मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.