Pune : विमनस्क महिलेला मिळाला माणुसकीचा आधार!

वृत्तपत्र विक्रेत्याच्या जागृकतेमुळे निराधार महिला वृध्दाश्रमात
pune women support humanity old age home awareness newspaper vendor
pune women support humanity old age home awareness newspaper vendorsakal
Updated on

कोथरुड : जागरूक नागरिकांनी आत्मियता दाखवल्यामुळे विमनस्क अवस्थेतील महिलेला माणुसकीचा आधार आणि निवारा मिळाला. वारजे मधील माई मंगेशकर हाँस्पिटल समोरील पुलालगत एक महिला काखोटीला पिशवी घेवून दोन दिवस बसली असल्याचे वृत्तपत्र विक्रेते बजरंग लोहार यांच्या निदर्शनास आले.

त्यांनी या महिलेची आस्थेने चौकशी केली. परंतु ही महिला काहीच बोलत नव्हती. स्वतःबद्दल काहीही सांगत नव्हती. लोहार यांनी त्या महिलेला चहा, बिस्किट देत धीर दिला. पोलिसांना तसेच हेल्प रायडर चळवळीच्या प्रशांत कनोजिया यांना या विषयी कळवले. व्हॉटसअप ग्रुपवर मदत मागितली.

pune women support humanity old age home awareness newspaper vendor
Pune News : विरोध कायम तरीही बालभारती पौड फाटा प्रकल्पाला स्थगिती नाहीच

बाळासाहेब ढमाले यांनी या पोस्टला प्रतिसाद देत आपल्या मुलीसह या महिलेच्या मदती साठी धाव घेतली. रात्री एकच्या सुमारास वारजे पोलिस, पौड मधील स्वामीनिवास वृध्दाश्रमाच्या गौरी धुमाळ, वृत्तपत्र विक्रेते बजरंग लोहार यांनी पुढील व्यवस्था होईपर्यंत त्या महिलेस वृध्दाश्रमात आधार देण्याची व्यवस्था केली. गोपाल झांबे यांनी मोफत रुग्णवाहीका देवून या महिलेला वृध्दाश्रमात पोहचवण्याची व्यवस्था केली.

बजरंग लोहार म्हणाले की, पुलाच्या लगत बसून असलेल्या या महिलेला मी गेले दोन दिवस या रस्त्याने जाताना पाहिले. ही महिला विमनस्क अवस्थेत असल्याने तीला मदतीची गरज असल्याचे जाणवले. म्हणून मी त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. त्यांना हिंदी भाषा समजते.

पण त्या कुठल्या आहेत हे समजू शकले नाही. समाज माध्यमावर या विषयी मदतीचे आवाहन करताच पोलिस व हेल्प रायडर मदतीला धावून आले. या महिलेला तीचे कुटूंबीय परत मिळोत एवढीच अपेक्षा आहे.

pune women support humanity old age home awareness newspaper vendor
Pune Rain : पुण्यात आजही अवकाळी, वादळी वाऱ्यासह बरसला पाऊस

स्वामीनिवास वृध्दाश्रमाच्या गौरी धुमाळ म्हणाल्या की, या महिलेला फार मोठा मानसिक धक्का बसल्याचे जाणवले. तीला आंघोळ घालत असताना तीच्या अंगावर मारहाणीचे व्रण दिसून आले. तीच्याकडे रेल्वेची तिकीटे, एक पँनकार्ड व आधारकार्ड सापडले पण ते तीचे नाहीत.

वैद्यकीय उपचार, तपासणी तसेच पोलिस तपासणी नंतर अनेक गोष्टी स्पष्ट होतील. या महिलेच्या मनावरील तणाव कमी करुन तीला सुस्थितीत आणण्यासाठी आवश्यक ती मदत करण्याचे आम्ही ठरवले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.