Pune Women Traffic Police: पुणे हादरले! महिला वाहतूक पोलिसावर पेट्रोल ओतत जाळण्याचा प्रयत्न

Drunk And Drive: पुण्यात ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणी कारवाई करत असताना एकाने महिला वाहतूक पोलिसाच्या अंगावर पेट्रेल ओतत जाण्याचा प्रयत्न केला आहे.
Pune Women Traffice Police
Pune Women Traffice PoliceEsakal
Updated on

पुण्यात ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणी कारवाई करत असताना एकाने महिला वाहतूक पोलिसाच्या अंगावर पेट्रेल ओतत जाण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान या प्रकरणातील आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

वाहन अडवल्याच्या कारणावरून पुण्यात एका महिला वाहतूक पोलिसाला भररस्त्यात पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला.

ही धक्कादायक घटना शहरातील बुधवार चौकात शुक्रवारी (ता. ५ जुलै) सायंकाळच्या सुमारास घडली. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान काल रात्री महिला वाहतूक पोलिसाबरोबर ही धक्कादायक घटना घडल्यामुळे शरहारात खळबळ उडाली आहे.

या प्रकरणाबाबत समोर आलेल्या माहितीनुसार शुक्रवारी सध्याकाळी साडे पाच ते सहाच्या सुमारास बुधवार पेठ चौकात वाहतूक पोलीस वाहतुकीचे नियमन करत होते. त्यावेळी महिला पोलीस अधिकाऱ्याने एका वाहनाला चौकशीसाठी अडवले. यानंतर वाहनचालकाची महिला अधिकाऱ्याशी बाचाबाची झाली. यावेळी आरोपीने महिला अधिकाऱ्यावर बाटलीतील पेट्रोल फेकले. परंतु त्यावेळी नेमके लायटर न पेटल्यामुळे पोलिस अधिकारी आणि कर्मचारी सुदैवाने बचावले.

या प्रकरणाबाबत महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले म्हणाले, "महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती विस्कळीत झाली आहे. त्याचा परिणाम म्हणजे आता पोलीस अधिकारीही सुरक्षित नाहीत. लोकांना आता पोलिसांची भीती वाटत नाही. हे राज्य सरकारचे अपयश आहे."

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.