Pune : येळवळी गावाला रस्ता झाल्याने मला मनोमन समाधान ; आ. मोहिते पाटील

येळवळी म्हणजे धरतीवरचा स्वर्ग म्हणटल तरी चुकीचे होणार नाही
मोहिते पाटील
मोहिते पाटीलsakal
Updated on

खेड : तालुक्यातील येळवळी ही एकमेव वस्ती राहिली होती की येथे पायी जावे लागत होते, पायी सुद्दा नीट चालता येत नव्हते, तत्कालीन उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजितदादांना मी धन्यवाद देतो कि त्यांनी त्यावेळी एवढ्या छोट्याश्या वस्तीसाठी भरीव निधी दिल्याने येळवळी या डोंगरावर वसलेल्या वस्तीच्या शेवटच्या टोकापर्यंत रस्ता करणे मला शक्य झाले, याचा मला खुप आनंद होत असून लवकरच हा रस्ता डांबरीकरणाच्या माध्यमातून पूर्ण होणार असल्याचे प्रतीपादन आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी येळवळी ( ता. खेड ) येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

येळवळी म्हणजे धरतीवरचा स्वर्ग म्हणटल तरी चुकीचे होणार नाही कारण पावसाळ्यात नयनरम्य निसर्गसौंदर्य, कोसळणारे धबधबे, उन-पावसाचा चाललेला खेळ, डोंगररांगावर उतरलेले ढगांचे पुंजके व दाट धुक्यात हरवताच क्षणात स्वच्छ होणारे वातावरण, वीस ते पंचवीस घरांचे व शंभर ते दिडशे लोकवस्तीचे गांव. सभोवतालची घनदाट झाडी, डोंगरांवर उतरलेले पांढरेशुभ्र ढग, डोंगराच्या पायथ्याला वाहणारे भिमा नदीचे स्वच्छ व नीतळ पात्र, पक्षांचे येणारे वेगवेगळे आवाज व क्षणात दाट धुक्यात हरवणारा संपूर्ण डोंगर व क्षणार्धात सर्वत्र स्वच्छ होणारे वातावरण हे सर्व अनुवताना खरच आपण खेड तालुक्यातच आहोत का या बाबत शंका निर्माण होते.

डोंगरावर स्थित येळवळी गावात गेल्यावर दिसणारी वस्ती व आपुलकीनी बोलणारी माणसे आपल्या स्वागताला तयार असतात यामुळे आपण खरोखरच स्वर्गात तर नाही ना असा भास होतो.... ते हे यळवली गांव. पर्यटणासाठी आल्यावर येथे तुम्हाला जेवण, मुक्कामासाठी टेंट ( तंबू ) व फिरण्यासाठी व परिसराची माहिती देण्यासाठी गाईडही उपलब्ध आहेत. गावापासून एक किमी. डोंगरावरील सपाटीवरून पुढे गेल्यावर निसर्गाचा खरा आनंद म्हणजे कोकण कडा पहायला मिळतो या कड्यावरून आपल्याला कलावंतीणीचा महाल, पेठचा किल्ला ( कोथळ गड ), तुंगीचा सुळका, माथेरानचे डोंगर, रिटर्न फॅाल व सगळ्यात नयनरम्य म्हणजे या कड्यावरून सनसेट ( सुर्यास्त ) पाहणे म्हणजे येथे आल्याचे खऱ्या अर्थाने सार्थक होते.

जंगल सफारी व एक दिवसाच्या मुक्कामासाठी हे अतीशय सुंदर व सुरक्षित ठिकाण. गेली काही वर्षात विवीध संस्थांनी व व्यक्तिंनी येथील नागरिकांना केलेल्या सहकार्यामुळे नागरिकांकडून पर्यटकांना नानाविध सुविधा उपलब्ध दिल्या होत्या मात्र रस्त्याअभावी पर्यटकांची संख्याही मर्यादीत होती. या गावाकडे जाण्यासाठी पक्का रस्ता नसल्याने वा येथे जाण्यासाठी जंगलातून मार्गक्रमण करावे लागत असल्याने येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या बोटावर मोजण्याइतकीच होती, व त्यामुळे एवढे प्रचंड निसर्गसौंदर्य असूनही येथील स्थानिकांना रोजगार नव्हता.

मात्र आमदार मोहिते यांनी सर्वप्रथम या गावाला लाईट उपलब्ध करून दिली व नुकताच या वस्तीकडे जायला सुंदर रस्ता निर्माण केला त्यामुळे येथील नागरिक सुभाष डोळस, दशरथ बाणेरे, सखुबाई बाणेरे, उषा बाणेरे, विष्णु काठे, एकनाथ डोळस, मंगेश सोनवणे, कांताबाई मेठल यांनी समाधान व्यक्त केले असून यामुळे पर्यटनात मोठ्या प्रमाणात वाढ होवून आम्हाला हक्काचा रोजगार उपलब्ध होणार असल्याचे ते म्हणाले. या रस्त्यावरून प्रथमच आमदार मोहिते यांनी आपली गाडी थेट येळवळी गावात नेऊन समाधान व्यक्त करत तत्कालीन आपल्या शासनाला धन्यवाद दिले.

यावेळी आमदार दिलीप मोहिते यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या जल जीवन अंतर्गत विविध गावच्या पाणीयोजना तसेच अन्य विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा पार पडला. प्रसंगी जिल्हा दूध संघाचे संचालक अरुण चांभारे, राष्ट्रवादीचे खेड तालुका अध्यक्ष कैलास सांडभोर, बाजार समीतीचे विलास कातोरे, भीमाशंकर देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष अॅड सुरेश कौदरे, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या मंगलताई चांभारे, माजी सभापती सुरेश शिंदे, रामदास माठे, महिला राष्ट्रवादीच्या सुजाता पचपिंड, रेवणनाथ थिगळे, खरोशीच्या सरपंच रोहिणी लांघी, चिखलगांवचे बाळासाहेब गोपाळे, डेहणेचे दत्ता खाडे,

मंदोशी-शिरगांवच्या शितल आंबेकर, कळमोडीच्या हेमलता गोपाळे, नामदेव गोपाळे, विठ्ठल वनघरे, एकनाथ तळपे, शिवाजी वाळुंज, तुळाजी लांघी, किरण वाळुंज, बबन गोडे, गणपत तळपे, यमन हुरसाळे, राझू तळपे, गणपत तळपे, लक्ष्मण हुरसाळे, नामदेव हुरसाळे, पांडूरंग तळपे, भोलेनाथ कौदरे, दत्ता भोईर, विलास करंडे यांच्यासह मोठ्या संख्येने विवीध गावंचे ग्रामस्थ तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()