पुणे : महिलेच्या पतीला घटस्फोट देण्यासाठी तिच्या पतीसमवेत संगनमत करुन संबंधित महिलेस जातीवाचक शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या करुणा शर्मा यांना येरवडा पोलिसांनी मंगळवारी सकाळी मुंबईतील निवासस्थानातून अटक केली. शर्मा यांच्याविरुद्ध येरवडा पोलिस ठाण्यात दोन दिवसांपूर्वी ऍट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर करुणा शर्मा यांनी वैयक्तीक आरोप केल्यानंतर त्या प्रकाशात आल्या होत्या.(Pune Yerawada police arrested Karuna Sharma)
याप्रकरणी एका महिलेने येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यावरून अजयकुमार विष्णू देडे (वय 32, रा.शिवाजीनगर, उस्मानाबाद) व करुणा शर्मा (वय 43, रा.सांताक्रुज, मुंबई) यांच्याविरुद्ध जीवे मारण्याची धमकी देणे, अनुसूचित जाती जमाती अन्याय अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार (ऍट्रोसिटी) गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा प्रकार नोव्हेंबर 2021 ते 30 मे या कालावधीत घडला आहे. फिर्यादी व अजयकुमार देडे यांची काही वर्षांपुर्वी लग्न झाले आहे.
दरम्यान, देडे यास पत्नीपासून घटस्फोट पाहीजे होता. त्यानंतर फिर्यादीचा पती व करुणा शर्मा यांनी संगनमत करुन फिर्यादीस त्रास देण्यास सुरुवात केली. दरम्यान, करुणा शर्मा हिने फिर्यादीस हॉकीस्टीकचा धाक दाखवून जातीवाचक शिवीगाळ केली. तसेच दोघांनीही फिर्यादीने घटस्फोट द्यावा, यासाठी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. पतीने फिर्यादीस मानसिक व शारिरीक त्रास दिला, अशी माहिती फिर्यादीने आपल्या फिर्यादीमध्ये नमूद केली आहे.
दरम्यान, या प्रकरणाचा तपास येरवडा विभागाचे सहायक पोलिस आयुक्त किशोर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होता. मंगळवारी सकाळी येरवडा पोलिसांच्या एका पथकाने शर्मा यांना त्यांच्या मुंबईतील घरून अटक केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.