घरगुती समस्या सोडवण्यासाठी पुण्यातील एका तरुणी ऑनलाइन ज्योतिष प्लॅटफॉमर्मवर नोंदणी केली होती.
यानंतर प्लॅटफॉर्मवर ओळख झालेल्या ज्योतिषाने या महिलेला सांगितले की, तिच्या कुटुंबावर कोणतरी काळी जादू केली आहे. यातून मुक्ती मिळवण्यासाठी विधी कराव्या लागतील.
या विधींच्या बहाण्याने ज्योतिष्याने महिलेला गुंगीची औषधे देत तिचे आक्षेपार्ह फोटो काढले. पुढे या ज्योतिषाने काढलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी देत 13 लाखांची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे, असे वृत्त इंडियन एक्सप्रेसने दिले आहे.
या प्रकरणातील पीडिता सुमारे 20 वर्षांची असून, ती सरकारी कर्मचारी आहे. या ज्योतिष्याविरोधात तिने स्वारगेट पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदवला आहे.
पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार या तरुणीसोबत हा सर्व प्रकार 2022 ते 2023 दरम्यान घडला आहे.
तरुणीने दिलेल्या तक्रारीत पुढे म्हटले आहे की, ही तरुणी काही घरगुती समस्यांमुळे त्रस्त होती. यातून मुक्ती मिळावी यासाठी तरुणीने ऑनलाइन अस्ट्रोलॉजी अॅपवर नोंदणी केली. अॅपवर ती उत्तर प्रदेशातील एक ज्योतिषाशी कनेक्ट झाली होती.
पुढे हा ज्योतिषी तरुणीला भेटण्यासाठी पुण्याला आला. तेव्हा त्याने तरुणीला सांगितले की, तिच्या कुटुंबार कोणीतरी काळी जादू केली आहे आणि यातून मुक्ती मिळवण्यासाठी काही विधी पार पडाव्या लागतील. यासाठी आरोपीने तरुणीकडून दोन लाख रुपये घेतले.
यावेळी आरोपीने तरुणीला एक लाडू खायला दिला. लाडू खाल्ल्यानंतर तरुणीला गुंगी आली आणि नंतरी ती निघून गेली.
विधी पार पाडूण अनेक महिने झाल्यानंतरही तरुणीच्या कौटुंबिक समस्या कमी झाल्या नाही. त्यामुळे तिने या ज्योतिषाला पुन्हा फोन केला. त्यावेळी तो म्हणाला की पार पडलेल्या विधी व्यवस्थित न झाल्याने समस्या सुटल्या नाहीत. त्यानंतर तरुणीला भेटण्यासाठी तो पुन्हा पुण्याला आला.
यावेळी आरोपीने विधी दरम्यान तरुणीला एक पिवळे द्रव्य पायला दिले. त्यानंतर ती बेशुद्ध पडली. जेव्हा तिला शुद्ध आली तेव्हा तिच्या लक्षात आले की, तिच्या घरातील अनेक मौल्यवान वस्तू आणि 2.3 लाखांचे सोन्याचे दागिने चोरी झाले आहेत.
दरम्यान काही दिवसांनी तरुणीच्या मोबाईलवर तिचे काही आक्षेपार्ह फोटो आले. जे ती बेशुद्ध पडल्यानंतर ज्योतिषाने काढले होते. या फोटोंसह तरुणीला एक मेसेजही आला होता. ज्यामध्ये तरुणीकेड पैसे मागितले होते.
यानंतर तरुणीला फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिला 13 लाख रुपये ऑनलाइन पद्धतीने पाठवण्यास सांगितले. पुढे या भिलेल्या तरुणीने फोटो व्हायरल होतील या भीतीने आरोपीला 13 लाख रूपये पाठवले.
दरम्यान तरुणीने नुकतेच या संपूर्ण प्रकरणाबाबत पोलिसांत धाव घेत, स्वारगेल पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.