Extortion : सनदी लेखापालाकडे ३० लाखांची खंडणी मागणाऱ्या तरुणाला अटक

सोशल मीडियावरील माहितीचा वापर करून एका सुशिक्षित तरुणाने सनदी लेखापालाला ३० लाखांची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे.
 Crim News
Crim Newsesakal
Updated on
Summary

सोशल मीडियावरील माहितीचा वापर करून एका सुशिक्षित तरुणाने सनदी लेखापालाला ३० लाखांची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे.

पुणे - सोशल मीडियावरील माहितीचा वापर करून एका सुशिक्षित तरुणाने सनदी लेखापालाला ३० लाखांची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी मुकुंदनगर येथील ५२ वर्षीय सनदी लेखापाल यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी किरण रामदास बिरादार (वय २४, रा. मांजरी, आवडकोंडा, ता. उदगीर, जि. लातूर) या संशयिताला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी किरण बिरादार हा बीएस्सी पदवीधर आहे. तो फेसबुक आणि इतर सोशल मीडियावरुन व्यावसायिकांची माहिती घेऊन त्यांचा मोबाईल क्रमांक मिळवून त्यांच्याकडे खंडणी मागतो. फिर्यादी यांनी त्यांचा मुलगा कोलकता येथे शिक्षण घेत असल्याची माहिती फेसबुकवर पोस्ट केली होती. ही माहिती घेऊन आरोपी बिरादार याने सनदी लेखापालाला व्हॉटसअप कॉलवर ३० लाख रुपयांची खंडणी मागितली. तसेच, पैसे न दिल्यास कोलकता येथे मुलाला ठार करीन, अशा धमकीचे मेसेज पाठविले.

फिर्यादी यांनी ही बाब खंडणी विरोधी पथकाला दिली. त्यावर पोलिसांनी फिर्यादीला बनावट नोटांची बॅग स्वारगेट येथील लक्ष्मीनारायण चौकाजवळ आणि नंतर डेक्कन येथील गरवारे पुलाखालील झुडपात ठेवण्यास सांगितले. त्यानुसार फिर्यादी यांनी गुरुवारी सकाळी आरोपीने सांगितलेल्या ठिकाणी बॅग ठेवली. त्यावेळी पोलिसांनी परिसरात सापळा लावला. आरोपी बॅग घेण्यासाठी आल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. आरोपीने यापूर्वी आणखी कोणाकडून खंडणी घेतली आहे का, याबाबत पोलिस तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.