रोजगारासाठी १०० दिवस कामाचे; अतिरिक्त दहा हजार मजुरांना मिळणार काम

Pune Zilla Parishad has launched 100 Days of Work initiative through Employment Guarantee Scheme
Pune Zilla Parishad has launched 100 Days of Work initiative through Employment Guarantee Scheme
Updated on

पुणे : रोजगार हमी योजनेतून मागेल त्याला काम उपलब्ध करून देण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेने ‘१०० दिवस कामाचे़' हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील १०० गावांची निवड करण्यात आली आहे. या सर्व गावांमध्ये रोजगार हमीचे किमान प्रत्येकी एक काम सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या सर्व गावांमध्ये किमान १०० मजुरांना रोजगार उपलब्ध करून दिला जाणार आहे.

Success Story: नोकरी सांभाळत 'ती' झाली ‘सीए’; एकत्र कुटुंबाची मिळाली साथ!​

जिल्हा परिषदेच्या या नव्या उपक्रमामुळे आणखी सुमारे १० हजार अतिरिक्त मजुरांच्या हाताला रोजगार मिळू शकणार आहे. प्रजासत्ताकदिनी (२६ जानेवारी) या उपक्रमाची घोषणा करण्यात आली आहे. यानुसार प्रत्येक जिल्हा परिषद सदस्याच्या गटातील (मतदारसंघ) गावांचा समावेश असणार आहे. यानुसार प्रत्येक तालुक्यातील किमान आठ गावांची निवड केली जाणार आहे. दरम्यान, बारामती तालुक्यातील जळगाव सुपे, वडगांव निंबाळकर, मुर्टी आणि मोरवाडी आंबेगाव तालुक्यातील आहुपे, बोरघर व गंगापूर खुर्द इंदापूर तालुक्यातील निगुडे व चाकाटी आणि जुन्नर तालुक्यातील आंबी आदी ठिकाणी या उपक्रमांतर्गत कामे सुरू झाली आहेत. जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत कामे करण्यात येत आहेत. हा नवीन उपक्रम याच योजनेचा भाग असणार आहे.

- रोहयोच्या कामांसाठी प्रस्तावित निधी --- १०६ कोटी
- ग्रामपंचायतींमार्फत करावयाची कामे --- २० हजार ७२०
- अन्य सरकारी यंत्रणांमार्फतची कामे --- ४ हजार ६३०
- रोहयोची एकूण प्रस्तावित कामे --- २५ हजार ३५०
- जॉबकार्डधारकांची संख्या --- २ लाख ११ हजार ६५१
- सक्रिय जॉबकार्डधारक --- ३७ हजार ९६
- सध्या सुरू असलेली कामे --- ५९२
- काम करत असलेले मजूर --- ३ हजार ३५९
- प्रति व्यक्ती प्रतिदिन रोजगार --- २३८ रुपये

तालुकानिहाय सुरू कामे - आंबेगाव - २९, बारामती - १११, भोर -२२, दौंड - २७, हवेली - २६, इंदापूर -८१, जुन्नर -११२, खेड - ९०, मावळ - ३, मुळशी - ७, पुरंदर -२१, शिरूर -४५, वेल्हे -१८.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
 

''जिल्ह्यातील अधिकाधिक गावांमध्ये रोजगार हमी योजनेची कामे सुरु व्हावीत. मागेल त्याच्या हाताला कामे मिळावे आणि या उपक्रमामध्ये रोजगाराची संधी मिळालेल्या प्रत्येक व्यक्तीला सलग १०० दिवस रोजगार मिळावा, अशा तिहेरी उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यामुळे १०० दिवसांत प्रत्येकी २३ हजार ८०० रुपयांचा रोजगार उपलब्ध होऊ शकेल.''
- श्रीरंग चोरघे, सहायक कार्यक्रम अधिकार, मनरेगा कक्ष

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.