पुणेकरांच्या शिरपोचात मानाचा तुरा रोवला

लष्करी अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगलेल्या पुण्यातील २९ वर्षीय तरुणाला अकरावर्षांच्या प्रयत्नानंतर यश आले आहे
लष्करी अधिकारी
लष्करी अधिकारीsakal
Updated on

पुणे : लष्करी अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगलेल्या पुण्यातील २९ वर्षीय तरुणाला अकरावर्षांच्या प्रयत्नानंतर यश आले आहे. डेहराडून येथील इंडियन मिलिटरी ॲकॅडमीमध्ये (आयएमए) (Indian Military Academy)चार वर्षांचे प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करून आदित्य जाणेकर हा सैन्यदलाच्या मॅकेनाइज्ड इन्फंट्रीमध्ये लेफ्टनंट म्हणून रुजू झाला आहे. यामुळे पुणेकरांच्या शिरपोचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

आदित्य हा मूळचा तळेगाव दिघे (संगमनेर) गावचा असून त्याचे कुटुंब आता पुण्यातच स्थायी झाले आहे. त्याचे बारावीपर्यंतचे शिक्षण पुण्यातील आर्मी पब्लिक स्कूलमधून झाले आहे. वडील आणि चुलते लष्करात असल्यामुळे घरात लष्करी वातावरणाचा सहवास होता. त्यात संपूर्ण बालपण लष्करी परिसरात झाल्यामुळे सैन्यात जाण्याचे स्वप्न त्याने बाळगले. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीची (एनडीए) परीक्षा दिली मात्र त्यात यश मिळाले नाही. आदित्य प्रयत्न करत राहिला आणि आज आपल्या जिद्दीमुळे या यशाच्या शिखरावर पोचला आहे.

लष्करी अधिकारी
एज इज जस्ट अ नंबर ;गुरमित सिंग

याबाबत आदित्यने सांगितले, ‘‘बाबा लष्करात होते पण आमच्या शिक्षणात अडचणी येऊ नये म्हणून आम्हाला त्यांनी पुण्यातच ठेवले. बारावी करत असताना दोन वेळा एनडीएची परीक्षा दिली पण यश हाती लागले नाही. आर्थिक परिस्थिती देखील अशी नवती की अभियांत्रिकी प्रशिक्षण घेऊ. बाबांनी आधीच माझा मोठ्या भावाच्या शिक्षणासाठी कर्ज काढले होते. म्हणून मी बारावी उत्तीर्ण होताच नौदलात दाखल झालो. सात वर्षे मी नौदलात सेवा देत असतानाच आयएमएसाठी तयारी करत होतो. आयएमएची प्रशिक्षण पूर्ण करून आज मी सैन्यदलात जाण्याचे माझे स्वप्न पूर्ण केले. यासाठी आई-वडिलांचा पाठिंबा मला मिळाला. तीच माझी खरी ताकद होती.’’

‘‘माझा मोठा मुलगा मर्चंट नेव्ही मध्ये असून आता आदित्यने ही घरातील देशसेवेची परंपरा कायम ठेवली आहे. त्याच्या या यशामुळे आम्हाला त्याचे कौतुक आहे. महाराष्ट्रातील तरुणांनी देखील लष्करात जाण्याचे प्रयत्न करावे. आजची तरुणाई खासगी क्षेत्रात किंवा इतर करिअर निवडतात. ज्या राज्यात छत्रपती शिवाजी महाराज सारखा शूरवीर जन्माला आला, आज त्याच राज्यातून लष्करात जाणाऱ्यांची संख्या तुलनेने कमी आहे. त्यात पालकांनी देखील मुलांना पाठिंबा द्यावा. आदित्यमुळे आता इतरांना ही प्रेरणा मिळेल.’’

- एकनाथ जाणेकर, आदित्यचे वडील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.