Pune : शनि महाराजांच्या दर्शनासाठी दहा हजाराहून अधिक भाविकांची गर्दी

“शनी शैनेश्वर महाराज की जय” या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता. दहा हजारहून अधिक भाविकांनी दर्शन घेतले.
Pune
Punesakal
Updated on

Pune - शेवाळवाडी –अवसरी फाटा (ता.आंबेगाव) येथील गोरक्षनाथ टेकडी येथे शनिवारी (ता.१७) शनी अमावस्या निमित्त शनी महाराजांच्या शिळेचे दर्शन घेण्यासाठी सकाळपासून भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. “शनी शैनेश्वर महाराज की जय” या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता. दहा हजारहून अधिक भाविकांनी दर्शन घेतले.

Pune
Mumbai : पथदिवे, सर्व्हिस वायर, तांत्रिक दोषरहित; महावितरणचा दावा चुकीचा

खेतानाथजी महाराज ट्रस्टच्या वतीने मानाचा अभिषेक चेन्नईहून आलेले महंत रमणी गुरुजी यांच्या प्रमुख उपस्थितीत शरद सहकारी बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, महंत तुफाननाथ महाराज, योगी मिर्चीनाथ महाराज, माई लक्ष्मीनाथ महाराज, ट्रस्टचे सचिव सुरेश भोर, विश्वस्त किशोर अडवाणी,

दत्ता थोरात, मिलिंद खुडे,ऋषिकेश गावडे, शिवराज भोर, संजय मिश्रा यांच्या हस्ते झाला. महेश पोळ व अमित सोमन यांनी पौराहित्य केले. खोपोली, लोणावळा, पुणे, राजगुरुनगर, नारायणगाव भागातून भाविक येथे आले होते. अनेक भाविकांनी अभिषेक केले. यावेळी नव ग्रहांचा अभिषेक करण्यात आला.

Pune
Mumbai : जोड मजबूत...तोंड विरुद्ध दिशेला काय मजबुरी असेल...मनसेचे आ.राजू पाटील यांचे ट्विट काय सुचवते

“येथील शनि महाराजांची शिळा जागरूक आहे. मंदिर परिसर हवेशीर असून नजीकच्या काळात शनि शिंगणापूर प्रमाणे येथे भाविकांची गर्दी पहावयास मिळेल.” असे महंत रमणी गुरुजी यांनी सांगितले. यावेळी पुणे जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शैलजा शिवाजीराव ढोबळे, प्रसिद्ध उद्योजक नरेंद्र धुमाळ, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

रुईची पाने,तेल, नारळ व पूजेचे साहित्याची दुकाने येथे थाटली होती. भाविकांसाठी अन्नप्रसादाची व्यवस्था होती. बापु निघोट, मुकेश परिहार, प्रवीण नहारअनुप भोर, मंगेश काळे, शितल निघोट यांनी व्यवस्था पहिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.