पुणे : शहरात अतिक्रमणे वाढत असताना त्याकडे अतिक्रमण निरीक्षक व सहाय्यक अतिक्रमण निरीक्षकांचे हितसंबंध तयार होत आहेत. त्यामुळे आता हा प्रकार रोखण्यासाठी दर तीन महिन्यांनी या कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याचे धोरण अतिक्रमण विभागाने तयार केले आहे. ते अतिरिक्त आयुक्त व आयुक्तांच्या मान्यतेसाठी पाठविण्यात आले आहे.