Vijay Pusalkar : पुण्यातील प्रसिद्ध उद्योगपती विजय पुसाळकर यांचे निधन

पुण्यातील प्रसिद्ध उद्योगपती विजय बाबूराव पुसाळकर (वय ८०) यांचे शनिवारी (ता. १५) रात्री उपचारादरम्यान अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुलगे, एक मुलगी आणि नातवंडे असा परिवार आहे.
Vijay Pusalkar
Vijay Pusalkarsakal
Updated on

औंध : पुण्यातील प्रसिद्ध उद्योगपती विजय बाबूराव पुसाळकर (वय ८०) यांचे शनिवारी (ता. १५) रात्री उपचारादरम्यान अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुलगे, एक मुलगी आणि नातवंडे असा परिवार आहे.

पुसाळकर यांनी त्यांच्या व्यावसायिक प्रवासाची सुरुवात कमिन्स इंडिया लिमिटेडमधून केली होती. कल्पकता आणि कठोर परिश्रमातून त्यांनी इंडो शॉटल ऑटो पार्ट्‌स प्रा. लिमिटेड कंपनीची स्थापना केली. विद्यार्थी साहाय्यक समितीसह विविध संस्थांवर त्यांनी विश्‍वस्त म्हणून काम पाहिले. त्यांनी मुलींसाठी शाळाही काढल्या.

यासह मंगेशकर हॉस्पिटल, कॉक्लियर इम्प्लांट सेंटर, अनाथाश्रम आणि अनेक शाळा, महाविद्यालयांसह रुग्णालयांना त्यांनी मदत केली. पुणे शहर पोलिस कल्याण निधीपासून ते माऊंट एव्हरेस्टच्या मोहिमेपर्यंत विविध उपक्रमांना त्यांनी साहाय्य केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.