Crime : पुण्यातील पत्नीचा युकेमध्ये खून करणाऱ्याला पतीला जन्मठेपेची शिक्षा

पुण्यात एमबीएचे शिक्षण घेऊन युनायटेड किंगडम (युके) मध्ये राहत असलेल्या पत्नीचा खून करणाऱ्या पतीला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
britain leeds crown court
britain leeds crown courtsakal
Updated on
Summary

पुण्यात एमबीएचे शिक्षण घेऊन युनायटेड किंगडम (युके) मध्ये राहत असलेल्या पत्नीचा खून करणाऱ्या पतीला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

पुणे - पुण्यात एमबीएचे शिक्षण घेऊन युनायटेड किंगडम (युके) मध्ये राहत असलेल्या पत्नीचा खून करणाऱ्या पतीला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. युकेमधील लीड्स क्राऊन न्यायालयाने हा निकाल दिला. सतप्रीत सिंग गांधी (वय ३७) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या पतीचे नाव आहे.

सतप्रीतला न्यायालयाने किमान २३ वर्षांची जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. गांधी याने ३२ वर्षीय पत्नी हरलीन कौर सतप्रीत गांधी यांचा चाकूने वार करून खून केला होता. हेडिंग्ले येथील व्हिक्टोरिया रोडवरील फ्लॅटमध्ये ५ सप्टेंबर २०२२ रोजी हा प्रकार घडला होता.

सतप्रीत यांचे वडील पुण्यातील दापोडी भागातील रहिवासी आहेत. याबाबत सीपीएसच्या वरिष्ठ सरकारी वकील एम्मा कोव्हिंग्टन म्हणाल्या, ‘हरलीन यांची हत्या पूर्वनियोजित आणि भयानक होती. गांधी याने आपल्या पत्नीची हत्या केली कारण, तो तिच्यावर मनमर्जी नियंत्रण ठेवू शकला नाही. यूकेला गेल्यानंतर तिने स्वतःसाठी निर्माण केलेल्या विश्‍व गांधीला पाहवले नाही. त्याने दोन लहान मुलांना त्यांच्या पालकांपासून वंचित ठेवले आहे. फिर्यादींनी गांधीविरुद्ध चांगला खटला निर्माण केला. पुराव्याचा सामना करावा लागला तेव्हा गांधीने आपल्या पत्नीच्या हत्येचा गुन्हा कबूल केला,’ असे क्राऊन प्रॉसिक्युशन सेवा (सीपीएस) या ब्रिटनमधील सरकारी संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तात नमूद आहे.

या न्यायनिवाड्याबद्दल सतप्रीतच्या पालकांनी ब्रिटनमधील न्यायालयाचे आभार मानले. ‘वेस्ट यॉर्कशायर पोलिसांनी सतप्रीतला दोषी ठरवण्यासाठी केलेले प्रयत्न आणि जलद खटला मंजूर करणाऱ्या न्यायव्यवस्थेचे आम्ही आभार मानतो. आमच्या दुसऱ्या मुलीच्या मृत्यूनंतर आम्ही पूर्णपणे खचून गेलो होतो. मात्र वेस्ट यॉर्कशायर पोलिसांनी आम्हाला विश्वास दिला आणि संपूर्ण प्रकरणात आम्हाला सहकार्य केले, असे त्यांनी नमूद केले. हरलीनच्या वडिलांनी त्यांच्या धाकट्या मुलीच्या मृत्यूबाबत प्रश्‍न उपस्थित केला आहे. आम्हाला शंका आहे की, हरलीनप्रमाणेच गांधीने सिमरनची हत्या केली असावी. तिचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याची बतावणी केली असावी. त्यामुळे आम्ही या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

गांधीचे हरलीनच्या मोठी बहिणीशी झाले होते लग्न -

हरलीनचे जानेवारी २०१५ मध्ये गांधींशी लग्न झाले होते. गांधीचे हे दुसरे लग्न होते. त्याने आधी हरलीनची मोठी बहिणी सिमरन कौरशी लग्न केले होते. मात्र तिचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. त्यानंतर हरलीन आणि गांधी यांचा विवाह झाला होता. मार्च २०२१ मध्ये हरलीन तिच्या मास्टर्स प्रोग्रामचा पाठपुरावा करण्यासाठी यूकेमध्ये शिफ्ट झाली. त्यावेळी गांधी तिच्यासोबत आश्रित व्हिसावर तिथे गेला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.