Purandar Airport: पुरंदर विमानतळासाठी कधी सुरू होणार भूसंपादन? उद्योगमंत्र्यांनी नेमकं काय सांगितले?

Purandar Airport Land Acquisition: पुण्यातील पुरंदरमध्ये हे विमानतळ बांधले जाणार आहे. हे विमानतळ 2,832 हेक्टरमध्ये असणार आहे.
Purandar Airport Land Acquisition
Purandar Airport Land AcquisitionEsakal
Updated on

पुरंदर येथे होणाऱ्या विमानतळासाठी एमआयडीसीच्या अंतर्गत भूसंपादना प्रक्रियेला लवकरच सुरुवात होणार असल्याची माहिती, राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.

या भूसंपादनासाठी केंद्रीय उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची उदय सामंत यांच्याबरोबर बैठक होणार आहे.

गेल्या काही काळात या विमानतळासाठी भूसंपादनाचे काम स्थानिकांच्या विरोधामुळे थांबले होते. दरम्यान आता हा प्रश्न निकाली निघण्याची शक्यता असून येत्या काही महिन्यांत विमानतळाचे काम सुरू होण्याची अपेक्षा आहे.

नुकतेच विवध विकास कामांच्या उद्घाटनासाठी पुण्यात आलेले उद्योग मंत्री सामंत म्हणाले, "राज्य आणि पुणेकरांच्या विकासासाठी पुरंदर विमानतळ प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे याच्यासाठी लागणाऱ्या जमीन भूसंपादन प्रक्रियेसाठी मी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासोबत तीन ते चार दिवसांत बैठक घेणार आहे."

सामंत पुढे म्हणाले, "आम्ही येत्या आठ दिवसांत या प्रकल्पाचे मॉडेल घेऊन येऊ, त्यानंतर आम्ही प्रत्यक्षात भूसंपादनाचे काम सुरू करणार आहे."

Purandar Airport Land Acquisition
Baramati Murder : बारामती हादरली! १२वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा कोयत्याने महाविद्यालय परिसरात खून

पुरंदर विमानतळाबाबत...

  • पुण्यातील पुरंदरमध्ये हे विमानतळ बांधले जाणार आहे. हे विमानतळ 2,832 हेक्टरमध्ये असणार आहे. विमानतळासाठी निवडलेल्या जागेला संरक्षण मंत्रालयाकडून सर्व मान्यता प्राप्त झाल्या आहेत.

  • या विमानतळासाठी राजेवाडी रेल्वे स्थानक हे सर्वात जवळचे रेल्वे स्थानक आहे. विमानतळापासून ते अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे.

  • या विमानतळामुळे पुणे शहराचा विकास होण्यास मदत होणार आहे. ज्यामुळे लोकांना शहरात ये-जा करणे सोपे होणार आहे.

  • या विमानतळासाठी भूसंपादनाचे आव्हान आणि स्थानिकांचा विरोध यामुळे प्रकल्पाची प्रगती खुंटली होती. या विमानतळाचे काम 2024 मध्ये सुरू होणे अपेक्षित आहे.

  • तीन ते चार वर्षांत नवीन विमानतळ बांधले जाईल.

Purandar Airport Land Acquisition
Chakan MIDC: चाकणमधील तब्बल 50 कंपन्या राज्याबाहेर? उद्योग संघटनेकडून दुजोरा; सुप्रिया सुळेंकडून सरकारवर हल्लाबोल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.