न्हावरे : ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी वस्तूचा दर्जा तपासून प्रमाणीकरण करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन भारतीय मानक ब्यूरो पुणे विभागाचे जॉईंट डायरेक्टर विनित कुमार यांनी केले.
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या न्हावरे (ता.शिरूर) येथील श्री मल्लिकार्जुन विद्यालयात मानक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून विनित कुमार बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी उपसरपंच अरूण तांबे होते. याप्रसंगी बोलताना विनित कुमार पुढे म्हणाले की पूर्वीची आय एस आय हीच संस्था बी आय एस म्हणून कार्यरत आहे.
औद्योगिक क्षेत्रातील उत्पादनांचा दर्जा तपासून त्यांचे प्रमाणीकरण करण्यात येते व दर्जा मानकाप्रमाणे असल्यास उत्पादनावर आय एस आय अथवा बी आय एस छापण्यास परवानगी दिली जात असल्याचेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी ग्राहकांची होणारी फसवणुक व उपाययोजना नाटिकेद्वारे सादर करून जनजागृती केली.
यावेळी मोबाईल मध्ये बी आय एस केअर ॲपद्वारे वस्तूची गुणवत्ता कशी ओळखायची याचे प्रात्यक्षिक बी आय एस च्या समन्वयीका प्रा.चित्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यानी दाखविले.
या कार्यक्रमास सरपंच अलका शेंडगे, ग्रामपंचायत सदस्या वृषाली कांगुने, शिरूर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष तुकाराम बेनके, सचिव मारुती कदम, पोलीस उपनिरीक्षक विक्रम जाधव, शिक्षक पालक संघाचे अध्यक्ष शरदराव पवार, आबासाहेब नवले, संभाजी कांडगे, विद्यालयाचे प्राचार्य डॉ. शाहीद शेख, पर्यवेक्षक संजय चव्हाण, बाळासाहेब जाधव, प्रा.जालिंदर जाधव, प्रा.राजकुमार जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमात बी आय एस मधील सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच सामान्यज्ञान परीक्षा घेवून पारितोषिके देण्यात आली. विद्यार्थ्यांनी कोणतीही वस्तू खरेदी करताना व व्यवहार करताना जागरूक असणे गरजेचे असून आपली फसवणूक होणार नाही याची दक्षता घ्यावी असे आवाहन प्रास्ताविकात प्राचार्य डॉ.शाहीद शेख यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.एन.बी.मुल्ला यांनी केले तर पर्यवेक्षक संजय चव्हाण यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.