औंध येथील राजीव गांधी पुलावर वाहनांच्या रांगा

नाकाबंदी ठिकाणांवर कडक तपासणी
Queues of vehicles on the Rajiv Gandhi Bridge at Aundh At check post)
Queues of vehicles on the Rajiv Gandhi Bridge at Aundh At check post)
Updated on

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर(Corona) संचारबंदी लागू असल्याने पोलिसांकडून(Police) शहरात नाकाबंदी ठिकाणावर कडक तपासणी करण्यात येत आहे. विशेषत: औंध येथील राजीव गांधी पुलाजवळच्या नाकेबंदी ठिकाणावर पोलिसांकडून बुधवारी वाहनांची तपासणी सुरु असताना वाहनांच्या दूरपर्यंत रांगा लागल्या होत्या. परिणामी, कोंडी झाल्याने वाहनचालक त्रस्त झाले होते.(Queues of vehicles on the Rajiv Gandhi Bridge at Aundh At check post)

कोरोनामुळे पुण्यात येणाऱ्या नागरिकांची कडक तपासणी सुरु केली आहे. त्यानुसार पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराचे प्रवेशद्वार समजले जाणाऱ्या औंध येथील राजीव गांधी पुलावरही चतु:शृंगी पोलिसांकडून पिंपरी-चिंचवडकडून पुण्यात येणाऱ्या वाहनांची कडक तपासणी केली जात होती.

Queues of vehicles on the Rajiv Gandhi Bridge at Aundh At check post)
पुणे महापालिका उभारणार लहान मुलांसाठी कोविड हॉस्पिटल

दरम्यान, तपासणी करण्याचे काम संथ गतीने सुरु होते. त्यामुळे पुलावरील औंधकडील बाजूच्या नाकेबंदी ठिकाणापासून ते सांगवी फाटा पुलापर्यंत वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे नोकरदार व अत्यावश्यक सेवेसाठी बाहेर पडणारे नागरिकही रांगेत अडकले. कामाला जाण्याच्या वेळेतच हा प्रकार घडल्याने नागरिकही त्रस्त झाले. तपासणीला विरोध नाही, मात्र पोलिसांनी तपासणीला गती द्यावी, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

याविषयी चतु:शृंगी ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजकुमार वाघचौरे म्हणाले, ‘‘संचारबंदी असतानाही नागरिक वेगवेगळी कारणे सांगून बाहेर पडत आहे. पोलिस उपायुक्त पंकज देशमुख यांनी स्वत: आज नाकेबंदी ठिकाणी पाहणी करून कडक तपासणी करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार औंध व अन्य नाकेबंदी ठिकाणी कडक तपासणी केली जात आहे. वाहनांची संख्या मोठी असल्याने रांग वाढत आहे, परंतु वैद्यकीय व अत्यावश्यक सेवेतील नागरिकांना सोडले जात आहे. विनाकारण बाहेर पडणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे.’’

Queues of vehicles on the Rajiv Gandhi Bridge at Aundh At check post)
पतीला वाचवण्यासाठी लता करे मॅरेथाॅन धावल्या पण, कोरोनाने घात केला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.