शर्यतीचा बैल विकत दिला नाही म्हणून नेला चोरून

शर्यतीचा बैल विकत दिला नाही म्हणून चोरुन नेल्याचा प्रकार बारामती तालुक्यातील मानाजीनगर येथे घडला. पोलिसांनी एक दिवसात चोरट्यांना पकडुन बैल ताब्यात घेतला.
Pune Crime
Pune CrimeSakal
Updated on

वडगाव निंबाळकर - शर्यतीचा बैल (Race Bullock) विकत दिला नाही म्हणून चोरुन (Theft) नेल्याचा प्रकार बारामती तालुक्यातील मानाजीनगर येथे घडला. पोलिसांनी (Police) एक दिवसात चोरट्यांना पकडुन बैल ताब्यात घेतला. संयोग संभाजी साबळे रा. बहुक ता. खेड जि. पुणे प्रवीण शिवाजी घेनंद रा. चाकण ता. खेड रोहित संजय यादव रा. कडाचीवाडी ता. खेड अशी बैलचोरी प्रकरणी पकडलेल्यांची नावे आहेत. याबाबत रमेश रामा करगळ (उसतोड मजुर) सध्या रा म्हसोबाचीवाडी मानाजीनगर ता बारामती मुळ रा बिड सांगवी ता आष्टी जि बिड यांनी पोलिसांकडे तक्रार नोंदवली होती.

सोमवार ता. १३ दिवसा फिर्यादी ऊसतोडीला गेले असता झोपडीसमोर बांधलेला खिलार जातीचे खोंड चोरून नेले. आजुबाजुला चौकशी करूनही काही माहिती मिळाली नाही. पोलिसांकडे जाव तर आपला भाग नाही. शेवटी हताश होऊन फिर्यादी दिसेल त्याला माझा खोंड दिसला का हो..असे विचारीत राहिला येथिल पत्रकार सचिन वाघ यांना माहिती कळाल्यावर पोलिसांकडे तक्रार नोंदवण्याचा सल्ला दिला.

Pune Crime
बारामतीचा अथर्व जाधव खेळणार राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत

गुरूवार ता. १६ रात्री पोलिसांनी तक्रार नोंदवली. चौकशीअंती गावात चाकण भागातील लोक खिलारी खोंड खरेदीसाठी येउन गेल्याची माहिती मिळाली. सखोल चौकशी करून पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले. पोलिस ठाणेत आनलेवर यांनी आगोदर चोरलेला खोंड विकत मागीतलेची माहिती पुढे आली. आरोपींना ताब्यात घेउन न्यायालयासमोर हजर केले असल्याची माहिती वडगाव निंबाळकर पोलिस ठाणेतील सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांनी दिली. फौजदार गणेश कवितके, पोलीस नाईक हिरालाल खोमणे, दादासाहेब डोईफोडे, गोपाळ जाधव यांनी तपास केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.