उद्योगपती राहुल बजाज यांच्यावर पुण्यात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

RAHUL BAJAJ PUNE
RAHUL BAJAJ PUNESAKAL
Updated on

पुणे: पुणे : उद्योगपती राहुल बजाज यांच्यावर रविवारी (ता.१३) संध्याकाळी साडेपाच वाजता पुण्यातील वैकुंठभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, महापौर मुरलीधर मोहोळ, खासदार सुप्रिया सुळे, योगगुरू बाबा रामदेव, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख आदी उपस्थित होते.

RAHUL BAJAJ PUNE
'ज्याला पंतप्रधानांना सुरक्षा देता आली नाही, तो काय...' अमित शहांची चन्नींवर टीका

बजाज यांचे ८३ व्या वर्षी शनिवारी (ता.१२) येथील खासगी रुग्णालयात निधन झाले होते. रविवारी सकाळपासून आकुर्डी येथील घरी पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. संध्याकाळी वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. केंद्र सरकारने २००१ मध्ये त्यांना सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले. २००६ ते २०१० या कालावधीत ते राज्यसभेचे सदस्य होते. बजाज समूहाला पाच दशकांहून अधिक काळ आघाडीवर ठेवण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता.

राहुल बजाज यांचा जन्म १० जून १९३८ रोजी कोलकता येथे झाला. १९६५ मध्ये त्यांनी बजाज समूहाची सूत्रे हाती घेतली. त्यांच्या सक्षम नेतृत्वाखाली कंपनीने कठीण काळातही यशाची नवी शिखरे गाठली. बजाज १९८० च्या दशकात दुचाकी स्कूटरची सर्वोच्च उत्पादक होती. त्यांनी अध्यक्षपद सोडल्यानंतर त्यांचा मुलगा राजीव बजाज यांनी ही जबाबदारी स्वीकारली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.