पुणे - काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वारंवार अपमान केला, स्वतःच्या सोईनुसार संविधानात बदल केला. मुस्लिमांचा मतपेटी म्हणून वापर केला. राहुल गांधी हे हातामध्ये संविधानाचे खोटे पुस्तक घेऊन प्रचार करतात, ते कधीही प्रगल्भ नेते होऊ शकणार नाहीत, अशी टीका केंद्रीय संसदीय मंत्री किरेन रिजिजू यांनी केली.