पिंपरी : लोकसभेत राहुल गांधींनी मोदी सरकारवर निशाणा साधत हे सरकार "हम दो हमारे दो' या मार्गावर चालत आहे. आमचा अर्थ आहे मोदी-अमित शाह, आमचे दोन म्हणजे अंबानी-अदानी, असे म्हणत टीका केली होती. यावर पलटवार करत "हम दो हमारे दो' या स्लोगन प्रत्यक्षात उतरविण्यासाठी कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आता लग्न करावे, असा उपरोधिक टोला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले व आरपीआय अध्यक्ष रामदास आठवले यांनी शनिवारी (ता.13) लगावला
ते शनिवारी (ता.13) खासगी कार्यक्रमानिमित्त शहरात आले होते. कासारवाडीमधील एका हॉटेलमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. परिषदेत आठवले विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देत होते. यावेळी राष्ट्रीय उपाध्यक्ष काकासाहेब खंबाळकर, पश्चिम महाराष्ट्र युवक आघाडीचे अध्यक्ष परशुराम वाडेकर, महिला आघाडीच्या सरचिटणीस चंद्रकांता सोनकांबळे, पुणे जिल्हा अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रमेश चिमूरकर, युवक आघाडी अध्यक्ष प्रणव ओव्हाळ उपस्थित होते.
आठवले म्हणाले, "जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे. त्यानुसार नेमके कोणाला आरक्षणाची गरज आहे, हे स्पष्ट करता येईल. पंतप्रधान मोदी यांनी दलितांची स्थिती सुधारण्यासाठी आमच्या खात्याला झुकते माफ दिले आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत 1 लाख 26 हजार कोटीची तरतूद केली आहे. दलितांवरील अत्याचार वाढत असताना, दुसरीकडे दलितांना पाठीबांदेखील दिला जात आहे. आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देण्यासाठी अडीच लाख रुपयांची प्रोत्साहनपर रक्कम दिली जात आहे. या विवाहामुळे जातीभेद कमी होतील.
कायदा शेतकऱ्यांना कळलाच नाही
कृषी कायदा शेतकऱ्यांच्या हितासाठी बनविला गेला आहे. परंतु असंविधानिकपणे शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. कायदे बदलण्याची मागणी चुकीची आहे. कुठेही कायदे बदलण्याची तरतूद नाही. सुप्रिम न्यायालयाच्या निर्णयानंतर हे आंदोलन थांबले पाहिजे होते. काही राजकीय लोक शेतकऱ्यांमध्ये गैरसमज पसरवीत आहेत. केंद्र सरकारचा शेतकऱ्यांविषयीचा हेतू स्पष्ट आहे. केवळ पंजाब, हरियाना येथील शेतकरी निषेध करीत आहेत. इतर राज्यांतील शेतकऱ्यांचा विरोध नाही. या आंदोलनाला पाकिस्तान किंवा चीनचा पाठिंबा नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पूजा चव्हाण हिच्या मृत्यूची चौकशी करा
"टिक टॉकस्टार' पूजा चव्हाण यांच्या रहस्यमय मृत्यूची चौकशी करण्याची मागणी आठवले यांनी केली आहे. देवेंद्र फडणवीसानंतर आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच या प्रकरणात जो दोषी असेल त्याच्यावर खटला चालविला जावा पण कोणताही अन्याय होऊ नये. बीड जिल्ह्यातील परळी येथील मूळ निवासी 22 वर्षीय हिने रविवारी मध्यरात्री पुणे शहरातील इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. पूजाचे विदर्भातील एका मंत्र्यांशी प्रेमसंबंध होते. पोलिसांकडे कोणतीही सुसाइड नोट मिळालेली नसली तरी हे नाते आत्महत्येचे कारण असल्याचे मानले जाते. या प्रकरणात महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिपदाच्या नावामुळे राजकारण तापले आहे.
हे वाचा - पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी भाजपने घेतलं थेट शिवसेनेच्या मंत्र्याचं नाव
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.