दौंड तालुक्याचा मंत्रीपदाचा वनवास कधी संपणार याकडे दौंडचे मतदार डोळे लावून बसले आहे. दौंड विधानसभेच्या निवडणुकीत राहुल कुल यांना निवडून द्या आम्ही त्यांना लाल दिवा देतो असे आश्वासन येथील मतदारांना २०१४, २०१९, २०२४ निवडणुकीत दिले गेले. आता ही हॅटट्रीक कोणाची व कशाची म्हणायची असा प्रश्न दौंडच्या मतदारांना पडला आहे.
ही हॅटट्रीक आश्वासनांची म्हणायची की, मतदारांनी शब्द पाळण्याची म्हणायची की, नेत्यांच्या भूलथापांची म्हणायची असा प्रश्न येथील मतदारांना पडला आहे. जुन्या व नवीन बारामती लोकसभा मतदार संघातील दौंड वगळता प्रत्येक तालुक्याला मंत्रीपद मिळाले आहे. जुन्या व नवीन लोकसभा मतदार संघात पिंपरी चिंचवड, बारामती, इंदापूर, शिरूर, भोर, पुरंदर, दौंड हे तालुके येत.