Rahul Narvekar : राहुल नार्वेकर यांचे कामकाज निष्पक्ष नाही; अंबादास दानवे यांचा गंभीर आरोप

विधानसभा अध्यक्ष पद हे निष्पक्षपणे काम करण्याची जागा असली तरी ते सध्या राजकीय हेतूने काम करत आहेत
ambadas danve and Rahul Narwekar
ambadas danve and Rahul Narwekar sakal
Updated on

पुणे : शिवसेनेच्या आमदारांवर अपात्रतेच्या संदर्भात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सुनावणी सुरू असताना ठाकरे गटाचे नेते व विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी गंभीर आरोप केला आहे. ‘‘राहुल नार्वेकर हे भाजप नेते आहेत. विधानसभा अध्यक्ष पद हे निष्पक्षपणे काम करण्याची जागा असली तरी ते सध्या राजकीय हेतूने काम करत आहेत. नार्वेकर हे सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठे नाहीत, अशा शब्दात दानवे यांनी टीका केली.

दानवे हे पुण्यात आले असता पत्रकारांशी संवाद साधला. दानवे म्हणाले, ‘‘राज्यात हे सरकार सत्तेत आल्यापासून महाराष्ट्रात १४०० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर आम्ही विरोधी पक्ष म्हणून आवाज उठवत आहोत, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे शेतकऱ्यांचा बांधावर जाऊन आले.

पण हे सरकार गेंड्याच्या कातडीचे असल्याने कार्यवाही करत नाही. राज्यात दुष्काळामुळे शेतकरी अडचणीत आला आहे, पण सरकार लक्ष देत नाही. यांना फक्त दिल्लीत मुजरा लावणे आणि तळवे चाटणे इतकंच सुरू आहे.

ambadas danve and Rahul Narwekar
Pune Crime : उत्तमनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन सराईत गुन्हेगार तीन जिल्ह्यांतून हद्दपार

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईला यायच्या आधी उद्योजक गौतम अदानी यांना भेटले आहेत. शरद पवार हे अदानी यांच्याकडे गेले तरीही अदानी हे भ्रष्टाचारी अशी आमची भूमिका आहे, असेही दानवे म्हणाले.

नागपूरच्या पुरावरून भाजप नेते लक्ष्य

नागपूर येथे मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीवरून पूरस्थितीवर बोलताना दानवे म्हणाले, ‘‘मुंबईत पाणी तुंबल्याने नेहमी आमच्यावर आरोप केले जातात. पण आता नागपूरची ही दयनीय स्थिती बघितल्यानंतर मोठ्या घरचा पोकळ वासा अशी अवस्था दिसत आहे. या शहरात नेतृत्वात अभाव असून, एका मोठ्या पावसाने जनतेचे हाल केले. त्यामुळे दुसऱ्यावर आरोप करताना स्वतःच्या खाली काय जळतय ते पाहिले पाहिजे, अशी टीका दानवे यांनी भाजप नेत्यांवर केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.