प्रवाशांनो, पुणे स्टेशनवर विनाकारण गर्दी करू नका

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांनी रेल्वे स्टेशनवर अनावश्यक गर्दी करू नये, असे आवाहन पुणे रेल्वे विभागातर्फे करण्यात आले.
पुणे स्टेशन
पुणे स्टेशन
Updated on

पुणे ः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांनी रेल्वे स्टेशनवर अनावश्यक गर्दी करू नये, असे आवाहन पुणे रेल्वे विभागातर्फे करण्यात आले. पुणे स्टेशनवर गर्दी रोखण्यासाठी सध्या ३० एप्रिल २०२१ पर्यंत प्लॅटफॉर्मची तिकिटे दिली जात नाहीत. फक्त ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, रूग्ण इत्यादींना प्लॅटफॉर्मची तिकिटे रू. ५० रूपये दराने दिली जात आहेत. कन्फर्म व आरएसी तिकिट असलेल्या प्रवाशांनाच प्लॅटफॉर्ममध्ये प्रवेश करण्याची आणि ट्रेनने प्रवास करण्याची परवानगी आहे. रेल्वे तिकीट प्रतीक्षा यादीतील प्रवाशांना प्लॅटफॉर्मवर येण्याची आणि ट्रेनमध्ये प्रवास करण्याची परवानगी नाही. त्यामुळे अशा प्रवाशांनी स्टेशनवर गर्दी करू नये. सध्या धावणाऱ्या विशेष गाड्या पूर्णपणे आरक्षित असून त्यामध्ये सेकंड एसी, थ्री एसी, स्लीपर आणि द्वितीय आसन श्रेणीचे कोच आहेत. या विशेष गाड्यांमध्ये कोणतेही सामान्य, अनारक्षित कोच उपलब्ध नाहीत.

पुणे स्टेशन
Success Story : कोथिंबीर पिकातून शेतकरी मालामाल

कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशांनी त्यांच्या गाडीच्या निर्धारित वेळेच्या ९० मिनिटांच्या स्लॉटमध्ये स्टेशनवर पोहोचावे. खूप अगोदर येऊ नये. रेल्वेचे पीआरएस काउंटर किंवा आयआरसीटीसी वेबसाईटवरुन प्रवासी त्यांचे तिकीट बुक करू शकतात.

पुणे स्टेशन
पुण्यात रुग्णालयेही ‘गॅस’वर; प्रशासनापुढे संकट

प्रवाशांनी रेल्वे प्रवासादरम्यान मास्क घालणे, सामाजिक अंतर ठेवणे, वारंवार हात धुणे, सॅनिटायझर वापरणे इत्यादी प्रोटोकॉलचे पूर्ण पालन करावे असे आवाहनही रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. विशेष गाड्यांविषयी सविस्तर माहितीसाठी www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस अॅप डाउनलोड करावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.