Latest Pune News: पुणे - दानापूर ( बिहार) एक्सप्रेस मध्ये तोतया तिकीट तपासणीस ( टीसी ) बनून प्रवाशांकडे पैशांची मागणी करणार्या तरूणास अटक करण्यात आली आहे. एका प्रवाशाच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला.
पुणे जिल्ह्यातील दौंड लोहमार्ग पोलिस ठाण्याचे हवालदार आनंद वाघमारे यांनी या बाबत माहिती दिली. ८ सप्टेंबर रोजी पुणे - दानापूर एक्सप्रेसने पुणे रेल्वे स्थानक सोडल्यानंतर सर्वसाधारण डब्यात एक साध्या वेशातील तरूण तिकीट तपासणीस असल्याचे भासवून प्रवाशांचे तिकिट तपासून पैशांची मागणी करीत होता.