Pune: रेल्वे कर्मचारी वसाहतीची झाडाझडती; विभागीय व्यवस्थापकांचा आदेश

गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर निर्णय
Railway News
Railway Newsesakal
Updated on

पुणे - गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमीवर विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदू दुबे यांनी ताडीवाला रस्ता परिसरात असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांच्या कॉलनीची तपासणी करण्याचा आदेश दिला आहे.

या परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून रेल्वे कर्मचारी स्वतःला राहण्यासाठी दिलेल्या घरामध्ये न राहता ती घरे बेकायदा भाड्याने देत आहेत.

Railway News
Pune : सिद्धार्थ शिरोळे यांच्यावर मध्यप्रदेशातील, 'या' विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी

अशा घरांत बाहेरील व्यक्ती राहून तिथे बेकायदा कृत्ये करीत असल्याचे पुरावे समोर आले आहेत. या पार्श्वभूमीवर दुबे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. तसेच त्या परिसरात रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांची नियुक्ती करण्याबरोबरच, तेथील घरांची तपासणी केली जाणार आहे.

नेमके काय झाले?

काही दिवसांपूर्वी मंगला चित्रपट गृहाजवळ तरुणाचा खून झाला होता.

हा खून ताडीवाला रोड परिसरातील रेल्वेच्या मोकळ्या जागेतील ताब्यावरून झाल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे.

याच परिसरात रेल्वेच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापकांचे कार्यालय आहे.

याच कार्यालयाच्या पाठीमागे रेल्वेच्या कर्मचाऱ्यांचा कॉलनी आहेत.

Railway News
Mumbai: खासदार शिंदेंचे दुर्लक्ष?, कल्याण लोकसभा मतदार संघात भाजप नाराज

यातील काही घरे बंद आहेत. बंद असलेल्या घरामध्ये गुंड प्रवृत्तीच्या लोकांचा ताबा आहे.

त्या ठिकाणी बेकायदा कामे केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली

त्यामुळे रेल्वे प्रशासनाला जाग

रेल्वे कॉलनीत जर बेकायदा कृत्ये घडत असतील तर संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल. कॉलनीतील खोली तपासण्याचे आदेश देण्यात आले आहे.

- इंदू दुबे, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, पुणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.