Pune Rain Update : मेघगर्जनेसह आज पाऊस;हवामान विभागाचा इशारा,हडपसरला पावसाने झोडपले

जिल्ह्यात पुढील दोन दिवस उन्हाचा चटका आणि ढगाळ हवामानाबरोबरच दुपारनंतर वादळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
Pune Rain Update
Pune Rain Updatesakal
Updated on

पुणे : जिल्ह्यात पुढील दोन दिवस उन्हाचा चटका आणि ढगाळ हवामानाबरोबरच दुपारनंतर वादळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. हडपसर, किरकटवाडी, धायरी भागांत शनिवारी वादळी वाऱ्यासह गारपिटीच्या पावसाने हजेरी लावली, तर बारामती परिसरातही हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला.

शहरात ढगाळ हवामानामुळे उन्हाचा चटका कमी-अधिक होत असतानाच, उकाडा मात्र कायम आहे. रविवारी (ता. १९) आकाश मुख्यतः निरभ्र राहून दुपारी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटात पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. राज्यातही विदर्भ, मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा, तर कोकणात उष्ण व दमट हवामानाचा इशारा दिला आहे. उर्वरित राज्यात कमाल तापमानात चढ-उतार होण्याचा अंदाज आहे.

आग्नेय राजस्थान आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती असून, त्यापासून मध्य महाराष्ट्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. मराठवाड्यापासून तमिळनाडूपर्यंत हवेचा दक्षिणोत्तर कमी दाबाचा पट्टा विस्तारला आहे. पूर्व-मध्य अरबी समुद्रात येमेनच्या किनाऱ्यालगत समुद्रसपाटीपासून १.५ ते ३.१ किलोमीटरपर्यंत चक्राकार वारे वाहत आहेत. बंगालच्या उपसागरात बुधवारपर्यंत (ता. २२) कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत असून, त्याची तीव्रता वाढणार आहे.

हडपसरमध्ये वादळाचा तडाखा

शनिवारी सायंकाळी चार ते पाचच्या सुमारास हडपसर भागात वादळाचा जोरदार तडाखा बसून अनेक मोठमोठी झाडे मुळासकट उन्मळून पडल्याची माहिती

‘सकाळ’चे वाचक ज्ञानेश्वर हेडाऊ यांनी दिली. आकाशवाणीजवळील फॉर्च्युन इस्टेट सोसायटी आणि इंद्रप्रस्थ सोसायटीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर ५० फूट उंचीची तीन झाडे पडली आहेत. तसेच मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटात सुरू झालेल्या पावसाने हडपसर भागाला झोडपून काढले. वादळासह सुरू झालेला पाऊस तासभर सतत पडत होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.