राजगड : शिवापट्टणवाडा स्थळांच्या उत्खननात सापडले वाड्याचे अवशेष

Video: खोदकामात बहामणी काळातील एक नाणे, मोठ्या दगडांचा पाया, मातीच्या विटांचे बांधकाम, उखळ, जुन्या मातीच्या भांड्यांचे अवशेष सापडले आहे.
वाड्याचे अवशेष
वाड्याचे अवशेष Sakal
Updated on

वेल्हे (पुणे) : छत्रपती शिवाजी महाराज यांचे सर्वात अधिक काळ वास्तव्य असलेल्या वेल्हे तालुक्यातील किल्ले राजगडाच्या पायथ्याला पाल खुर्द येथील शिवरायांच्या शिवापट्टण वाडा स्थळाच्या उत्खननात शिवकालीन बांधकामाचे अवशेष सापडले आहेत. खोदकामात बहामणी काळातील एक नाणे, मोठ्या दगडांचा पाया, मातीच्या विटांचे बांधकाम, उखळ, जुन्या मातीच्या भांड्यांचे अवशेष सापडले आहे.

दरम्यान प्रशासनाने खबरदारी घेतली असुन शिवापट्टण वाडा तसेच शिवरायांच्या महाराणी सईबाई समाधी स्थळांच्या परिसरात पर्यटक तसेच नागरिकांना प्रतिबंध करण्यात आला आहे. छत्रपती शिवरायांचे वास्तव्य शिवापट्टण वाड्यात अनेक वर्षे होते. राजगडा प्रमाणे येथे कचेरी असल्याचे मत इतिहास अभ्यासकांकडून व्यक्त केले जात आहे.

उत्खननातील अवशेष
उत्खननातील अवशेष Sakal

शिवापट्टण च्या वाड्याला शिवरायांचा राजवाडा तर फळझाडांच्या बागेला शिवबाग अशी ओळख आहे. गुंजवणी नदीच्या तिरावरील छत्रपती शिवरायांच्या पत्नी महाराणी सईबाई यांच्या समाधी स्थळाचेही खोदकाम सुरू आहे. या दोन्ही ठिकाणी फिरणाऱ्यांस प्रतिबंध करण्यात आला आहे. तसा आदेश भोर विभागाचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे यांनी दिला आहे.

पुरातत्व खात्याच्या तंत्रज्ञ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली खोदकाम करणाऱ्या मजुरांना सकाळी ८ ते सांयकाळी ५ पर्यंत या परिसरात काम करता येणार आहे. त्यानंतर सांयकाळी ५ ते सकाळी ८ पर्यंत या परिसरात सर्वांना प्रतिबंध करण्यात आला आहे. ऐतिहासिक दुष्ट्या अत्यंत महत्वाचे वस्तू ,ऐवज यांना कोणतीही हानी पोहचु नये यासाठी खोदकाम सुरू असताना हा परिसर पर्यटक तसेच स्थानिकांना बंद करण्यात आला आहे.

उत्खननातील अवशेष
उत्खननातील अवशेष Sakal

पुरातत्व विभागाच्या वतीने गेल्या आठवड्यात ३ मार्च रोजी शिवापट्टण वाडा व महाराणी सईबाई साहेब समाधी स्थळांच्या उत्खनानास सुरुवात झाली. अत्यंत महत्त्वाच्या ऐतिहासिक स्थळांच्या उत्खननामुळे शिवकालीन वारसा प्रकाशात येणार आहे. किल्ले राजगड च्या पायथ्याला असणाऱ्या शिवपट्टण वाड्याच्या ठिकाणी प्रथमच अशा प्रकारचे उत्खनन करण्यात येत आहे. त्यासाठी शासनाने निधी मंजूर केला आहे. पन्नास मजुरांच्या साह्याने दोन्ही स्थळाचे उत्खनन करण्यात येत आहे.

गुंजवणी नदीच्या तिरावरील सईबाई समाधी स्थळांच्या उत्खननात अद्याप वस्तू अथवा बांधकामाचे अवशेष सापडले नाहीत. मात्र शिवरायांचे वास्तव असलेल्या शिवापट्टण वाड्याच्या ठिकाणी खोदकाम करताना मोठा शिवकालीन ठेवा उजेडात येऊ लागला आहे. त्यामुळे खोदकाम करणारे मजूर,अधिकारीही आश्चर्य चकित होत आहेत. शिवापट्टण वाड्याचा मोठा विस्तार असल्याचे एका भागाच्या उत्खननातुन पुढे आले आहे.

उत्खननातील अवशेष
उत्खननातील अवशेष Sakal

मुळ वाड्याच्या तटबंदीच्या भितींचे अवशेष ठिक ठिकाणी आहेत. काही ठिकाणी मोठी झाडे वाढली आहेत. गवत, झुडपे काढुन वाड्याच्या मुळ ठिकाणी खोदकाम करताना जमीनदोस्त झालेल्या भिंतीचे शिवकालीन बांधकाम शैलीतील बांधकाम, दगडी चिरेबंदी तसेच विटांचेही बांधकाम आहे. दर्जेदार व अतिशय उत्कृष्ट बांधकाम आहे.

पुरातत्त्व खात्याचे सहसंचालक विलास वाहणे यांच्या देखरेखीखाली मुळ ठिकाणचे संपुर्ण उत्खनन करून त्याच्या अवशेषाचे पुरातत्वतीय संशोधन केले जाणार आहे. त्यासाठी दोन महिन्याचा कालावधी लागणार आहे. १५ व्या शतकातील बहामणी राजवटीतील एक नाणे शिवापट्टण वाड्याच्या खोदकामात सापडले. या ठिकाणी प्रथमच उत्खनन करण्यात येत आहे.

शिवरायांच्या शिवापट्टण वाड्यास ऐतिहासिक दुष्ट्या अत्यंत महत्त्व आहे. ऐतिहासिक दस्त, कागदपत्रात शिवापट्टण वाडा, शिवबाग याचा उल्लेख आहे. राजगडावरून रायगडावर राजधानी हलविण्या आधी येथे गुप्त बैठका, परदेशी अधिकारी शिवरायांना भेटण्यासाठी आल्याचे उल्लेख आहे.

  • १)उत्खनन करण्याच्या ठिकाणी तात्काळ विजेचे खांब बसवण्यात आले असते तरी अद्याप विद्युतपुरवठा सुरू झालेला नाही.

  • २) उत्खनन हे दिवसा चालू असते याठिकाणी प्रतिबंध केला असला तरी अनेक हौशी पर्यटक या ठिकाणी येत असल्याची माहिती ग्रामस्थांकडून देण्यात आली हे उत्खननाचे काम पूर्ण होईपर्यंत दिवसा व रात्रीच्या वेळी या ठिकाणी सुरक्षारक्षक नेमणे महत्त्वाचे आहे असल्याचे मत काही शिवप्रेमी संघटनांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.