केडगाव - खुटबाव (ता. दौंड ) येथील तीन अनाथ बहिणींनी (Orphaned Sisters) गलांडवाडी (ता. दौंड) अनाजी खाडे बालकाश्रमातील निराधार विद्यार्थ्यांना मिठाई भरवत आज राख्या (Rakshabandhan) बांधल्या. गेल्या सात वर्षापासून त्या येथे राख्या बांधत आहेत.
खुटबाव येथील शुभांगी पायगुडे, धनश्री पायगुडे, अर्चना पायगुडे या बहिणींनी ही राखी बांधली आहे. या बहिणींना भाऊ नाही. त्यांची आई इंदूबाई पायगुडे व वडील लक्ष्मण पायगुडे यांचे सात वर्षापुर्वी निधन झाले, तेव्हापासून पायगुडे बहिणी अनाथाश्रमात येऊन निराधार मुलांना राखी बांधत आहे. आईवडील नसल्याचे दुःख काय असते हे त्या जवळून अनुभवत आहेत. आज या बहिणींनी भावांना मिठाई भरवून रक्षाबंधन साजरे केले.
शुभांगी पायगुडे या खुटबाव येथील भैरवनाथ विद्यालयात लिपिक म्हणून काम करीत असून अर्चना पायगुडे या शिक्षक आहेत. तर तिसरी बहीण धनश्री पुणे येथे संगणक अभियांत्रिकीची नोकरी करीत आहे.
शुभांगी पायगुडे म्हणाल्या, हे विद्यार्थी दरवर्षी रक्षाबंधनाला आमची वाट पहात असतात. आम्हीही त्यांना सख्या बहिणी इतका आधार देतो. आम्हाला भाऊ नाही असे कधीही वाटत नाही. हे विद्यार्थी भाऊ बहिणीला ज्या हक्काने अडचणी सांगतो त्या हक्काने ते आम्हाला सुद्धा त्यांच्या अडचणी सांगतात. अडचणीचे निवारण झाल्यावर त्यांना व आम्हाला एक वेगळाच आनंद मिळतो. यावेळी संस्थेचे सचिव बापू बडे, सचिन बोरकर, माजी विद्यार्थी व पत्रकार बापू नवले, विद्यार्थी उपस्थित होते.
गलांडवाडी येथे खंडेराव खाडे व प्रमिला खाडे यांनी हे अनाथाश्रम २१ वर्षां पुर्वी चालू केले आहे. कोणत्याही शासकीय मदतीशिवाय हे अनाथाश्रम चालविले जात आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.