दुसऱ्यांना हसविणाऱ्या ‘जोकर’च्या डोळ्यात पाणी

‘लॉकडाऊन’मुळे रॅम्बो सर्कसच्या कालाकारांची उपासमारीची वेळ
Rambo circus performers no income due to lockdown
Rambo circus performers no income due to lockdownDilip Kurhade
Updated on

येरवडा : मुंढवा पुलाजवळ रॅम्बो सर्कसचे खेळ सुरू होणार होते. मात्र कोरोनाच्या पाश्‍वभूमीवर पोलिसांनी त्यांना तंबु उभारण्याची परवानगी दिली नाही. त्यामुळे गेली वीस दिवसांपासून ४५ कलाकार व २६ कर्मचाऱ्यांचा मुक्काम तंबूत आहे. आयुष्यभर अबालवृध्दांना हसविणाऱ्या बिजू आणि राजूच्या डोळ्यात पाणी तरळत होते. तरी सुद्धा इतरांचे मनोधैर्य उंचविण्यासाठी जागतिक सर्कस दिनाच्या निमित्ताने त्यांनी एका लहान कार्यक्रमाचे आयोजन केले हाेते. 'रॅम्बो सर्कसचे शो देशभर होत असले तरी पुणे हे त्यांचे घर आहे. गेल्या वर्षीच्या लॉकडाऊनमध्ये तब्बल नऊ महिने रॅम्बो सर्कसचा मुक्काम नवी मुंबईतील एरोलीत होता. तर आता यावर्षी पुन्हा तेच संकट असताना त्यांचा मुक्काम पुण्यात आहे.

या संदर्भात मुख्य जोकर बिजू नायर म्हणाले, ‘‘देशभरातील सर्कस आता बंद झाले आहेत. कलाकार त्यांच्या गावी निघून गेले आहेत. मात्र रॅम्बो सर्कसचे मालक सुजित दिलीप यांच्या आग्रहामुळे सर्कसची कला अजून जिवंत आहे. गेल्या वर्षीच्या लॉकडाऊनमध्ये सुरवातीला उपासमार झाली. स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून ऑनलाईन सर्कस सुरू केली होती. त्यामुळे सर्व कलाकारांचे मानधन मिळाले. त्यांच्या घरीही पैसे पाठविता आले. त्यानंतर अंधेरीत शो करण्यासाठी गेलो मात्र लॉकडाऊन झाल्यामुळे परत पुण्यात आलो. ’’

मुंढवा येथील उड्डाणपुलाजवळ सर्कसचा तंबु टाकणार त्याच वेळी पोलिसांनी तंबु टाकण्याची परवानगी नाकारली. त्यामुळे गेली वीस दिवस सर्व कलाकार व कर्मचारी आपापल्या लहानशा तंबुत राहत आहेत. सोबत अठरा कुत्री सांभाळत आहेत. दररोजचा खर्च सतरा हजार रूपये आहे. हा सर्कसच बंद असल्यामुळे हा खर्च मालकाला सुद्धा पेलवत नाही. त्यामुळे दानशुर मंडळींकडून मदतीची अपेक्षा असल्याचे नायर यांनी सांगितले.

दु:ख विसरून हसण्याची कला उपजतच

‘जोकर’चे विश्‍व वेगळेच असते. तो सर्कसमधील रंगमंचावर रडता रडता हसतो, तर कधी हसता हसता रडतो. त्यामुळे प्रेक्षक तो रडला तरी हसतात. हेच कसब जोकर खरे खुरे आयुष्य जगताना सुद्धा दाखवितात. याची प्रचिती सर्कस दिनला आली. गेली वीस दिवसापासून सर्कसचे खेळ बंद आहेत. तरी सुध्दा सर्व कलाकारांचे मनोधैर्य उंचविण्यासाठी जोकर बिजू नायर यांनी सोशल डिस्टसिंग ठेऊन लहान कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.