रांजणगाव : शिरूर तालुक्यातील रांजणगाव गणपती ते सोनेसांगवी, मलठण अष्ठविनायक रस्त्याचे काम ठप्प असून रस्त्याची दुरावस्था झाल्याने हे काम त्वरीत सुरू करण्याची मागणी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना निवेदन देऊन करण्यात आल्याची माहिती आंबेगाव शिरूर विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी कॅाग्रेस चे अध्यक्ष मानसींग पाचुंदकर यांनी दिली.
श्री महागणपती हे अष्ठविनायका पैकी श्री रांजणगाव गणपती एक क्षेत्र आहे. त्यामुळे अष्ठविनायक वारी करणारे श्री क्षेत्र ओझर ( ता. जुन्नर ) च्या श्री विघ्नहर्ता गणपतीकडून येणाऱ्या जाणाऱ्या भावीकांची संख्या मोठी असते. त्यामुळे रांजणगाव गणपती ते सोनेसांगवी ते मलठण या मार्गावरून अष्ठविनायक रस्ता मंजूर झाला. यासाठी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मोठ्या प्रमाणात निधी टाकला आहे. त्यानुसार या रस्त्याचे काम देखील सुरू झाले. मात्र लांडेवस्ती परीसरात रस्त्याचे काम अर्धवट ठेवण्यात आले आहे. त्यामुळे माळवस्ती, शेळकेमळा, लांडेवस्ती, व देवकर वस्ती भागातील नागरिकांना या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. सोनेसांगवी ते मलठण या रस्त्याचे काम अपुर्ण आहे. त्यामुळे येथील नागरिकांना व भावीकांना त्रासदायक प्रवास करावा लागत आहे.
खंडाळे ( ता. शिरूर ) हे गाव पुणे नगर हायवे पासून पश्चिम बाजूस तीन किलोमिटर अंतरावर आहे. येथील ग्रामस्थ व शेतकऱ्यांना मुख्य रस्त्याला येण्यासाठी खंडाळे माथा मार्गे लांबच्या व उलट बाजूने असणाऱ्या रस्त्याचा वापर करावा लागतो. या नागरिकांना प्रोबेल कंपनी पासून जवळचा मार्ग आहे. यासाठी पुणे नगर हायवे वरील प्रोबेल कंपनी जवळील डिव्हायडर काढून रस्ता खुला करण्यात यावा. पुणे नगर हायवेच्या पुर्व बाजूस या परीसरातील शेतकऱ्यांच्या शेतजमीनी आहेत. हा रस्ता खुला झाल्यास शेतमाल बाजारपेठेत नेण्यास मदत होईल.असे ही या निवेदनात म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.